शहरातील बांधकाम व्यावसाईकांचे धाबे दणाणले.
खरेदी खत नोंदणी कार्यालयातील निबंधक, कारकुन व वरिष्ठ अधीकार्यांना मोठी लाच देउन शहरातील सामान्य नागरीकांची जमीन खरेदीची मुळ खरेदीखते नोंदणी कार्यलयातुन काढुन सम नाव असलेल्या खोट्या व्यक्तीला उभे करुन सामान्य लोकांच्या जमीनी करोडो रुपयांना विकनार्या अजीत बीरभान कटारीया, सेनापती बापट रस्ता ,प्रदीप गुलाब देवतळे रा विश्रांतवाडी पुणे व ईत्तर ३ भामट्यांना मार्केट यार्ड पोलीसांनी केली अटक.
पुणे शहरातील अश्या तर्हेने विकलेल्या अनेक जमीनींची प्रकरणे बाहेर निघणार : सह आयुक्त सुनील रामानंद
पुणे : खोट्या व्यक्तीला खरी म्हणुन उभी करुन १ कोटी ६० लाख रुपयांना धानोरी येथील १ एकर जमीन विकणार्या प्रदीप गुलाबराव देवतळे रा विश्रांतवाजी पुणे, करमजीत लाभसींग कौर ,गुरमीतसींग व गुरजीत कौर सर्व राहणार जबलपुर , ह्या सर्वांना पोंलीसांनी अटक केली आहे,
अजीत बीरंभान कटारीया व प्रदीप देवतळे यांनी अनेक जमीनींची मुळ खरेदी खते शहरातील वेगवेगळ्या नोंदणी कार्यालयातील अधीकार्यांना लाच देउन मीळवली होती व त्या आघारे जमीनी शोधुन व न्याय पालीकेच्या वेगवेगळ्या कलमांचा आधार घेउन जनीनी वीकल्या आहेत . े.
सदर गुन्ह्याचा तपास सह पोलीस आयुक्त श्री सुनील रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट यार्ड पोलीसांनी हाती घेतल्यानंतर खरी वस्तुस्थीती बाहेर आली, सदर प्रकरण हे अतीशय कीचकट असताना, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त मीलींद मोहीते, व पोलीस निरीक्षक खैरे, सुनील दोरगे व त्यांच्या सहकार्यांनी खुप परीश्रम घेउन हा गुन्हा उघडकीस आणुन थेट मुळाशी ते पोचले. प्रदीप देवतळे ह्याने तर ६ महीन्यापुर्वी गुन्हे शाखेत येउन जवाब दील्याचे कळते,
सदर प्रकरण उघडकीस आल्यानंतर शहरातील अनेक बांधकाम व्यावसाईकांचे धाबे दणाणल्याचे दीसुन आले, कटारीया व देवतळे यानी अशा अनेक खरेदीखतांचा वापर करुन अनेक बांधकाम व्यावसाईकांना जमीनी विकुन करोडो रुपयांची माया गोळा केल्याचे तपासात आढळुन येत आहे, ह्यातील एक आरोपी प्रदीप देवतळे ह्याला आज दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली आहे.
देवेंद्र जैन न्युज
