रेल्वे प्रवासात आजारी पडलेल्या महीलेच्या मदती करीता सह पो आयुक्त श्री सुनील रामानंद यांचे मार्फत अती पो अधीक्षक तुशार दोशींची मदत.
पुणे ०४ जुलै : कल्याण येथुन उद्यान एक्सप्रेसने बंगळुरु करीता निघालेल्या सौ आशा प्रकाश जैन यांच्या औषधाच्या गोळ्या कल्याण येथेच राहील्या, रेल्वेने पुणे स्थानक सोडल्या नंतर त्यांची तब्येत बीघडली असता त्यांनी त्यांच्या भावाला बंगळुरु येथे संम्पर्क साधला, आशा यांना रेल्वेची जास्त माहीती नसल्यामुळे त्यांच्या भावाने पुणे शहरात त्यांच्या ओळखीच्या पत्रकाराला संपर्क केला, सदर पत्रकाराने त्वरीत हालचाल करुन सदर बाब सह पोलीस आयुक्त श्री सुनील रामानंद यांचे कानावर घातली, सह आयुक्तांनी रेल्वे अति पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी यांना संम्पर्क करुन, रेल्वे कुर्डवाडी स्थानकात पोचणे आधीच सहायक पोलीस निरीक्षक रामदास आवारे व त्यांचे सहकारी, आशा जैन यांना लागणारी औषधे घेउन तयार होते, थोड्याच वेळात उद्यान एक्सप्रेसचे आगमन झाले व पोलीसांनी त्वरीत आशा जैन ज्या डब्यात प्रवास करत होत्या तेंथे जाउन त्यांना औशधे दीली, जैन यांनी लागलीच औषधे घेतली व त्यांना लगेच बरे वाटंले, श्री आवारे यांनी जैन यांना सोलापुर येथे जात असलेल्या महीला पोलीस कर्मचार्याला सोबत करुन दीली तसेच आवश्यक वाटल्यास सदर महीला कर्मचार्याला काही सुचना दिल्या.
रेल्वे पोलीसांनी केलेल्या मदती करीता आशा जैन व संतोष जैन व डब्यातील प्रवाषांनी जल्लोष केला, व सर्वांनी खुप खुप आभार मानले, तसेच रेल्वे पोलीसांच्या च्या मदती मुळे एका महीलेला झालेला धोका टळला.
देवेंद्र जैन यु एन आय
