“”अच्छे दीन”” च्या नावावर देशातील सामान्य जनतेला नवीन वाहन कायदे काढुन छळण्याचा उध्योग सुरु आहे,
सामन्य माणुस बीचारा तुटक्या फुटक्या रस्त्यावरुन त्याच्या दुचाकीवरुन स्वत: ची व घरची कामे करतो.
खरे तर संम्पुर्ण देशात हेलमेट न घातल्यामुळे अपघातात मयत झालेल्यांची संख्या अगदी बोटावर मोजण्या ईतकीच आहे, कारण आपल्या देशात वाहन चालवायला चांगले रस्ते कुठे आहेत, हे सरकार “”अच्छे दीन”” नक्कीच देईल ह्या अपेक्षेने निवडुन दीले, पण “”अच्छे दीन “” सोडा पण आता तर ह्या सरकारने वेगवेगळे कायदे काढुन लोकांच्या सुरक्षीतेच्या नावावर “”भ्रष्टाचार “” कसा वाढेल ह्याची काळजी नक्कीच घेतली आहे, खरे तर देशामध्ये ज्या गोष्टींची वानवा आहे त्यावर उपाय शोधायच्या एैवजी सामान्य माणसाला जगणे मुश्कील केले आहे, आधी पोलीसाने पकडले तर १०० रुपायात काम व्हायचे, आता तर कमीतकमी ५०० रुपये द्यावे लागणार, नाहीतर पी यु सी दाखव, ईंशुरन्स, दाखव, हेलमेट दाखव, मागे बसलेल्याचे हेलमेट, मुलाचे हेलमेट, सगळ दाखवले तरी पोलीस म्हणनार वाहन वेगात आहे, दंड झाला ५००० रुपये, मरनार कोण , सामान्य माणुस,
मत देणार कोण , सामान्य माणुस,
जो वाहन चालवतो तो, त्याची सुरक्षीतता नक्कीच घेतो, त्याला माहीती असते की त्याच्या घरी कोणी तरी त्याची वाट पाहत आहे,
पण वातानुकुल वाहना मध्ये व कार्यालयामध्ये फीरणार्या ह्या लोकांना सांगणार कोण, ते ज्या खुर्चीवर बसले आहेत ती खुर्ची ह्या देशातील सामान्य माणसाने देशाचे कल्याण करण्या करीता दीली आहे हे ते सर्व विसरले आहेत,
त्यांना आठवण करुन द्यायची वेळ परत २०१९ ला येणार आहे, हे ते विसरले,
महागाई कुठे चालली हे त्यांना माहीत नाही, ह्या देशातील सामान्य माणसाच्या पैशावर ही लोक जगत आहेत, ह्यांच्या सुरक्षेकरीता अब्जो रुपयांचा खर्च चालु आहे, हे अब्जो रुपये कोणाच्या खीशातुन आले?
साखर, तेल, तुप, दुध, भाज्या ह्या विकत घ्यायंला ते कधी गेलेत का? साधा रस्ता बनवु शकत नाही आणी नवीन मोटार वाहन कायदा ह्या देशातील सामान्य माणसाच्या माथी मारुन ह्या देशात नक्कीच अराजक स्थीती निर्माण करीत आहेत.
मोदीजी मी पण तुमचा चाहता आहे, पण आता सहन होत नाही, कीती मारनार आम्हाला, आधीच खुप छळ झाला, आता तरी थांबा व देश नवीन वाहन कायद्याने नाही, पण सर्वांना सुखी केले तरच सुधारणार,
मोदीजी आपण, व ह्या राज्यात फडणवीस साहेबांनी सुरु केलेला नवीन मोटार कायदा थांबवा.
जनतेने पण ही मागणी मांडावी, नंतर नका ओरडु “”पोलीसांवर”” की ते “”पैसे खातात “”म्हणुन.
देवेंद्र जैन पत्रकार पुणे
