Featured

‘डाव्यांची ढोंगबाजी’

‘डाव्यांची ढोंगबाजी’ पुस्तकाचे

उद्या शुक्रवारी पुण्यात प्रकाशन

भारतीय जनता पार्टी,महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी लिहिलेल्या
‘डाव्यांची ढोंगबाजी’ भ्रष्टाचार,हिंसाचार आणि दंडुकेशाही’ या पुस्तकाचे पुण्यात शुक्रवार १२ ऑगस्ट रोजी ज्येष्ठ पत्रकार व खासदार स्वपन दासगुप्ता यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.

कम्युनिस्ट कंपूतीलनेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सातत्याने त्यांच्या लोकशाहीप्रेमाचे आणि तत्त्वनिष्ठ साधेपणाचे गोडवे गायले. पण प्रत्यक्षात या डाव्या पक्षांचे वास्तव काय आहे, याची मांडणी या पुस्तकात करण्यात आली आहे.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे असतील. या प्रसंगी स्तंभलेखिका व ब्लॉगर शेफाली वैद्य या खा. स्वपन दासगुप्ता यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.

पुण्यात घोले रस्त्यावरील महापालिकेच्या पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या या प्रकाशन समारंभास उपस्थित रहावे,असे आवाहन प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक रवींद्र साठे यांनी केले आहे.

Share This
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top