Pune Crime

भारतीय शास्त्रज्ञाने अमेरिकेत निर्माण केली, ज्वलनविरहीत मँगनीज डायॉक्साइडची ‘रिचार्जेबल’ व अधिक साठवणूक क्षमता असलेली बॅटरी

gautam g yadav pic
शास्त्रज्ञ गौतम अमेरिकेतील प्रयोगशाळेत संशोधन करताना

पुणे ३० मार्च २०१७ (पीसीपी न्यूज) : रासायनिक शिक्षणाची पार्श्वभूमी असलेल्या गौतम गणपती यादव ह्या भारतीय शास्त्रज्ञाने १५० वर्षापासून प्रलंबित असलेल्या समस्येवर संशोधन करून अमेरिकेत नुकतीच ज्वलनविरहीत मँगनीज डायॉक्साइडची ‘रिचार्जेबल’ व अधिक साठवणूक क्षमता असलेली बॅटरी निर्माण केली आहे. गौतम गणपती यादव हे मुळचे कोल्हापूरचे, उच्च शिक्षणासाठी न्युयॉर्क येथील जगप्रसिद्ध असलेल्या सिटी युनीवर्रसिटी च्या एनर्जी इंस्टीत्युट मध्ये संशोधन करीत आहेत, त्यांच्या ह्या संशोधनामुळे तमाम भारतीयान बरोबर कोल्हापूरकरांची मान गर्वाने उंचावली आहे.

गौतम ह्यांचे वडील गणपती यादव हे स्वत देशातील रासायनिक शिक्षणाची पंढरी समजल्याजाणार्या इंडिअन केमिकल इंस्टीट्युत चे कुलगुरू आहेत, नुकतेच त्यांना भारत सरकारने पद्मश्री देऊन गौरवले आहे, ह्याच संस्थेने देशाला अनेक शास्त्रज्ञ, अधिकारी, उद्योगपती दिले आहेत, पुणे शहराचे सह पोलिस आयुक्त सुनील रामानंद, उद्योगपती मुकेश अंबानी, रघुनाथ माशेलकर, ह्यांचे शिक्षण येथेच झाले हे विशेष, मुलाच्या संशोधनावर त्यांनी समाधान व्यक्त केले, पण संतुष्ट नसल्याचे दिसून आले, त्यांच्या बोलण्यातून गौतमला अजून खूप मोठा पल्ला गाठीचा आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले, भारताचे नाव त्याने आणखीन मोठे करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपल्या गावाबद्दल गणपती ह्यांनी बोलताना “कोल्हापुरच्या मातीचा गुण काही वेगळाच असतो” असे आवर्जून सांगितले.

शास्त्रज्ञ गौतम ह्यांनी पीसीपी न्यूज ह्या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी अमेरिकेहून बोलताना सांगितले की, MnO2-Zn ह्या बॅटरीचा १५० वर्षापासूनचा इतिहास आहे, फ्रान्सच्य जॉर्जलेक्लान्के हा शोध लावला होता, गेली १५० वर्ष अनेक संशोधन ह्या बॅटरी करण्यात आली, दिवसेंदिवस ह्या बॅटरी चा वाढतच चालला आहे, त्याकरिता मी व माझे सहकारी त्यावर संशोधन करत होतो, अखेर आम्हाला यश मिळाले व १५० वर्षांची समस्या सुटण्यास मदत झाली. आपल्या घरातील बहुतांश उपकरणांमध्ये वापरण्यात येत असलेली लिऑन बॅटरी ज्वालाग्रही आहे, त्यामुळे प्रदूषण तर वाढतेच पण उत्तर धोके पण जास्त असतात, याशिवाय तिचे उत्पादनही खर्चीक असून पर्यावरणास घातकही असतात. यावर उपाय म्हणून मँगनीज डायॉक्साइडची ‘रिचार्जेबल’, अधिक साठवणूक क्षमता आणि ज्वलनशील नसलेली बॅटरीची निर्मिती केली. गेली तीन वर्षे न्यूयॉर्क सिटी विद्यापीठातील ऊर्जा संस्थेत यावर गौतम यांच्या नेतृत्वाखाली संशोधन सुरू होते.

हे संशोधन भारतासाठी खूपच महत्वाचे ठरणार आहे, कारण भारतात मोठय़ा प्रमाणावर सौरऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे, हे प्रकल्प उभे राहिल्यावर त्यातून निर्माण होणारी वीज वाहून नेण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करून मनोरे उभे करावे लागतात. हे मनोरे उभे करण्यासाठी मोठा कालावधी लागत असल्यामुळे वीज साठवणूक ठेवण्याकडे उद्योगांचा कल आहे. ही वीज साठविण्यासाठी गौतमच्या बॅटरची उपयोग होणार आहे, असे गौतम व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. गौतम व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक आव्हानांना पार करत पुनर्वापरासाठी आवश्यक ती रासायनिक प्रक्रिया पूर्ण करण्यात यश प्राप्त केले, ते पुढे म्हणाले की, या बॅटरीचा फायदा उद्योगांना मोठय़ा प्रमाणावर होणार आहे, परिणामी तो सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे. ह्या संशोधनामुळे सौर आणि पवनचक्कीतून निर्माण होणारी ऊर्जा साठविण्यासाठी येणारी अडचण दूर होणार आहे, त्याचबरोबर मोठय़ा गाडय़ांमधील ज्वालाग्रही बॅटरीसाठीही हा पर्याय ठरू शकणार आहे, क्षारात आढळणारे मँगनीज डायऑक्साइड हे मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहे, त्यामुळे कमी खर्चात बॅटरीची निर्मिती करण्यात आली.

शास्त्रज्ञ गौतम यांच्या संशोधनाची दखल जगप्रसिद्ध नेचर कमुनिकेषण ह्या मासिकाने लगचेच घेतली व त्याबाबतचा लेख नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. पीसीपी/डीजे १३ ३०

Share This
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top