पुणे १० मार्च २०१७ (पीसीपी न्यूज) : महापालिकेच्या निवडणूकेचे मतदान शांततेत पार पडणेकारीता २० ता मतदांनाच्या आदल्या रात्री सह पोलीस आयुक्त सुनिल रामानंद यांनी शहराच्या मध्यवस्तीतील गुन्हेगारीचा प्रभाव असलेल्या भागात आॅपरेशन ‘धुलाई’ राबवले. विशेष म्हणजे कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या घरात घुसून पोलिसांनी तपासणी करीत, रस्त्यावर उभ्या असलेल्या टोळक्याला खास पोलिसी ‘प्रसाद’ दिला. पोलिसांच्या या धडाकेबाज मोहिमेची चर्चा नागरिकांमध्ये आता रंगू लागली असून गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवून दिल्यामुळे, नागरिकांनी समाधान व्यक्त केले जात आहे. बर्याच नागरिकांनी मात्र आॅपरेशन ‘धुलाई’ बाबतची बातमी मतदानाच्या दिवशी प्रसिद्ध झाली असती तर नागरिकांचे मनोबल आणखीन वाढले असते, अश्या प्रकारच्या कारवाया करीत असताना पोलिसांनी प्रसारमाध्यमांना लगेचच कळवावे, अशी अपेक्षा, अनेक स्थानिक रहिवाश्यानी आमच्या प्रतनिधी समोर व्यक्त केली.
वर्षभरात पोलिसांनी आॅपरेशन क्लिनअपद्वारे शेकडो गुन्हेगारांना तडीपार करीत अनेकांवर स्थानबद्धतेची कारवाई केली, तर अनेक गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्काची कारवाई केल्याने निवडणुका शांततेत पार पडण्यास मोठी मदत झाली. निवडणुकीदरम्यान पोलिसांनी गुन्हेगारीचा प्रभाव असलेल्या काही ‘पॉकेट्स’ वर विशेष लक्ष केंद्रित केले होते. आंदेकर टोळीच्या अनेक गुंडांनाही तडीपार करण्यात आले होते. 21 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले. 2० फेब्रुवारी रोजी रात्री सह पोलीस आयुक्त सुनिल रामानंद समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वत: फिरुन आढावा घेत होते. त्यावेळी बंडू आंदेकरच्या घरासमोर टोळके उभे असतात आणि ते नागरिकांना त्रास देतात अशी माहिती मिळाली. रामानंद स्थानिक पोलिसांसह तेथे गेले. सुरुवातीला टोळक्याला चोप देत आंदेकरच्या घरामध्ये घुसून सर्च घेण्यात आला. मात्र, तेथे कोणीही मिळून आले नाही.
त्यानंतर, गणेश पेठेतील मासे मार्केटजवळ उभ्या असलेल्या टोळक्याला सहआयुक्त रामानंद यांनी ‘प्रसाद’ दिला. त्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी प्रभाव असलेल्या भागात वळवला. लोहियानगर, कासेवाडी, भवानी पेठ भागात दमदार गस्त घातली. स्वत: रामानंद यांनी हाती घेतलेल्या या मोहिमेमुळे पोलिसांचेही मनोबल वाढले असून नागरिकांमधून मात्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सदर आॅपरेशन ‘धुलाई’ बाबतची माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांना “न” देण्याची मात्र पुरेपूर काळजी घेतली. सह पोलीस आयुक्त रामानंद व पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पुणे शहराच्या गुन्हेगारीचा बिमोड करण्याकरिता अनेक नामचीन गुन्हेगारांना येरवड्याचा रस्ता दाखवलाय, निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच ह्यावेळची निवडणूक शांततेत पार पडली, विशेशकरून ज्या भागात गुन्हेगारांचा वर्चास्मा आहे तेथील नागरिकांनी मतदान निर्भय होऊन करावे, स्वछ चारित्र्याच्या उमेद्रवारांना नागरिकांनी निवडून द्यावे, हा त्यामागचा उद्देश होता. पीसीपी/ल/मो ११ ३०
