पुणे ०९ मे २०१७ एन पी न्यूज प्रतिनिधी,: संपूर्ण राज्याला हादरवून सोडलेल्या संगणक अभियंता नयना पुजारी अपहरण, बलात्कार व खून प्रकरणातील तीन आरोपींना विशेष न्यायाधीश एल.एल. येनकर यांनी तीनही आरोपींना फाशी शिक्षा सुनावली. त्यांना अपहरण, जबरी चोरी, सामुहीक बलात्कार, खून, मृताच्या शरिरावरील ऐवजज चोरणे, कट रचणे असे सहा गुन्ह्या खाली दोषी ठरवण्यात आले. तर माफीचा साक्षीदार राजेश चौधरी याची निर्दोष मुक्ता केली आहे.
योगेश अशोक राऊत (वय 32, रा. मु.पो. गोळेगाव, ता. खेड), महेश बाळासाहेब ठाकूर (वय 31, रा. सोळू, ता. खेड), विश्वास हिंदूराव कदम (वय 34, रा. हनुमंंत सुपर माकर्रेटजवळ, दिघीगांव, मूळ, भुरकवडी, ता. खटाव, जि. सातारा) अशी फाशीची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. तर राजेश पांडूरंग चौधरी (वय 31, रा. मु.पो. गोळेगाव, ता. खेड), अशी मुक्तता केलेल्या माफीच्या साक्षीदाराचे नाव आहे. संगणक अभियंता नयना अभिजीत पुजारी (वय 28) या खाराडी येथील सेनीक्रॉन प्रयव्हेट लिमीटेड या सॉफ्टवेअर कंपनीत संगणक अभियंता म्हणून कामास होत्या. त्या 7 आक्टोबर 2009 रोजी रात्री 8 च्या सुमारास कात्रज येथे घरी जाण्यासाठी खराडी येथील रिलायन्स मार्टजवळील लक्ष्मी हॉस्पिटलजवळील बस स्टॉपवर बसची बाट पहात थांबल्या होत्या. त्यावेळी आरोपी इंडिका कारमधून (एम.एच. 14, बी.ए. 2952) त्या ठिकाणी आले. त्यांनी नयना पुजारी यांना हडपसर येथे सोडण्यासाठी प्रवासी म्हणून कारमध्ये घेतले. त्यानंतर नयना यांना वाघोली, तुळापूर, जरेवाडी (ता. खेड) येथे नेवून सामुहीक बलात्कार करत खून केला.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान राजेश चौधरी हा आरोपी माफीचा साक्षीदार झाला. दरम्यान या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर काम पहात आहेत. तर बचाव पक्षातर्फे अॅड. बी.ए.आलुर, अॅड. रणजित ढोमसे-पाटील आणि अॅड. अंकुश जाधव काम पाहिले. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अॅड. निबाळकर यांनी एकूण 37 साक्षीदार तपासले आहेत, तर बचाव पक्षातर्फे अॅड. आलुर यांनी 13 साक्षीदार तपासले आहेत. दोन्ही पक्षाकडून न्यायालयात अंतिम युक्तीवाद झाल्यानंतर आणि न्यायालयास असलेल्या शंकांचेही दोन्ही पक्षांनी निरसण केले. त्यानंतर मंगळवारी न्यायालयाने तीन आरोपींना शिक्षा मरे पर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. पीसीपी/एनपी/ १७ ३०
