SARIKA ZUTE
SUICIDE NOTE
Pune 10 Aug 2017 (PCP NEWS PARBHANI): वडिलांनी आत्महत्या करु नये म्हणून बारावीत शिकत असलेल्या मुलीने (सारिका झुटे) स्वत:ची जीवनयात्रा संपवली.
सारिकाच्या आत्महत्येच्या अगदी सहा दिवस आधी तिचे काका चंडिकादास झुटे यांनी आत्महत्या केली होती. याचा उल्लेख सारिकाने सुसाईड नोटमध्येही केला आहे.परभणीच्या पाथरी तालुक्यातील जवळाझुटा इथे ही धक्कादायक घटना घडली. सारिकांच्या वडिलावंर शेतीसाठी कर्ज होतं. शिवाय पाऊस नसल्यामुळे पीकही वाळत जात होतं. त्यामुळे उत्पन्नाचं कोणतंही साधन शिल्लक नव्हतं, कर्जाच्या टेन्शनमुळे वडील आत्महत्या करतील, अशी भीती सारिकाच्या मनात होती, त्यामुळे त्याआधीच तिने आपलं आयुष्य संपवलं.
सदर घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. राज्य सरकार ने सदर घटनेची गंभीरपणे दखल घेणे गरजेचे आहे.
आत्महत्येच्या ठिकाणी सारीकाने स्वतः लिहलेली सुसाईड नोट आढळली आहे त्या मध्ये तिने लिहिलं आहे की,
प्रिय पप्पा,
आपल्या भाऊंनी पाच सहा दिवसापूर्वी शेतातील सर्व पीक जळू गेल्यामुळे शेतात जाऊन आत्महत्या केली. तसेच आपल्या घरावर कर्जाचा बोजा, त्यात पाऊस पडत नसल्याने तुम्ही कर्ज काढून केलेली पेरणी सर्व जळून गेल्यामुळे तुमचे हाल व घरातील ताण मला बघवत नाही. आपल्या दीदीचे गेल्यावर्षी लग्न झाले, तेच कर्ज अजून फिटले नाही आणि तुमच्यावर माझ्या लग्नाची जबाबदारी असल्याने तुम्ही पण आपल्या भाऊंसारखी घटना करु नयेत, यामुळे मी माझे जीवन संपवते.
तुमची सारिका
PCP/DJ 15 30
