पुणे पीसीपी प्रतिनिधी : लोकसभा व विधानसभा निवडणुका जश्या जवळ येउ लागल्या आहेत, तसे सर्वच राजकीय पक्षांमध्ये नेते, सामाजीक कार्यकर्ते खेचण्या करीता चढाओढ लागल्याचे चित्र दिसुन येत आहे. मात्र निवडणुकी आधी भारतीय जनता पक्ष (भा ज प) ला मोठा दणका बसणार असल्याचे चित्र सद्यस्थितीत दिसून येते. पुणे शहरातील माहीती अधिकार कार्यकर्ते रविंद्र ब-र्हाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस च्या विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी अधिकार पत्र बहाल करुन २०१९ चे रणशिंग फुंकले आहे.
भाजप चे तत्कालीन विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या वतीने रविंद्र ब-र्हाटे यांना सरकारी, निमसरकारी कार्यलयां मधुन वेगवेगळी कागदपत्रे २००५ च्या माहीती अधिकार कायद्याचा वापर करुन काढण्याचे अधिकार पत्र २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या अगोदर काही वर्ष दिले होते. ब-हाटे यांनी मीळवलेल्या अनेक कागदपत्रातुन हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यात आला, व त्याचा वापर करुन २०१४ मध्ये सत्ता देखील काबीज करण्यात आली. पण ज्या खडसेंनी, ब-र्हाटे नावाचे वादळ उभे केले व त्याचा वापर करुन सत्ता काबीज केली त्या खडसेंना पक्षाने दुरच ठेवले. आता ब-हाटे नावाच्या वादळाचा सत्ता मीळवण्यासाठी खुबीने वापर करुन त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेस च्या विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी खडसेंनी दिलेले अधिकार बहाल करुन २०१९ चे रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात भाजपच्या अनेक नेत्यांचे बींग फुटल्यास नवल वाटणार नाही.
या अधिकार पत्राचा वापर करून बऱ्हाटे आता राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व जेथे माहीती अधिकार कायदा लागु अश्या सर्व संस्थांकडे मुंडे यांच्या वतीने आवश्यक कागदपत्रे जमा करणे करीता माहीती अधिकार कायद्याखाली अर्ज करुन आवश्यक माहिती मिळवून मुंडे यांना पुरवतील. या बाबतचे पत्र मुंडे यांच्या कार्यालयातुन १६ नोव्हंबर २०१८ रोजी जारी करण्यात आले आहे. या बाबत ब-र्हाटे यांना विचारले असता, त्यांनी असे अधिकार पत्र मिळाल्या बाबत दुजोरा दिला.
भाजप बरोबर ब-रहाटे ची गेली अनेक वर्ष जवळीक होती व त्यांची अनेक गुपीते त्यांना माहीत आहेत व पुढील काही दिवसात भाजपच्या कोणत्याही नेत्यांवर जर मुंडे यांनी आरोप केल्यास ते नाकारणे खुद भाजप ला नक्कीच जड जाईल कारण भाजपच्याच ब्रम्हास्त्राचा वापर मुंडे करणार हे निश्चित आहे. २०१९ च्या निवडणुकी आधी राज्यात नक्कीच मोठी धक्कादायक घटना घडणार हे आता ब-र्हाटे मुळे सर्वश्रुत आहे. मुंडे यांनी घेतलेला निर्णय त्यांना २०१९ च्या निवडणुकी मध्ये सत्ता मीळवुन देतो का, हे पाहणे औचित्याचे ठरेल.
