Pune Crime

बनावट गुंठेवारी दाखल्यांचा सुळसुळाट महापालिका बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांशी संगनमताने बांधल्या जात आहेत अनेक बेकायदेशीर इमारती

बनावट गुंठेवारी दाखल्यांचा सुळसुळाट

बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांशी संगनमताने बांधल्या जात आहेत अनेक बेकायदेशीर इमारती

महापालिका मुकत आहे करोडो रुपयांच्या महसुल

अधिकारी गब्बर महापालिकेची तिजोरी रिकामी

पुणे: शुभम जैन
शहराच्या अनेक भागात बनावट गुंठेवारी दाखल्यांचा वापर करुन शेकडो इमारती महापालिकेचा करोडो रूपयांचा महसुल बुडवुन बांधल्या जात असल्याचा भक्कम पुरावा माहीती अधिकारात पीसीपी न्यूजच्या हाती लागला आहे.

कोंढवा भागात मोठ्या प्रमाणावर बनावट शिक्के वापरुन या दाखल्यांचा वापर झालेला आहे. या बाबत अनेक स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यानी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यावर प्रशासन मुग गिळुन गप्प आहे. या इमारतींमध्ये हजारो नागरिक सदनिका खरेदी करुन वास्तव्यास आहेत. पाच, दहा गुंठ्याच्या भूखंडावर 4 अथवा 5 चटई क्षेत्र निर्देशांक (एफ एस आय) वापरून या इमारती उभारल्या गेल्या आहेत. पुर्णता बनावट दाखल्यांचा वापर करून बांधलेल्या या अनधिकृत इमारती कोसळून कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

येथील सामाजीक कार्यकर्ते अकबर भाई शेख यांनी दिलेल्या माहीतीनुसार, शकील अहमद खां यांनी त्यांच्या मालकीच्या कोंढवा येथील सर्वे क्रमांक 46 मध्ये 543.27 चौरस मीटर भूखंडा मध्ये नकाशा प्रमाणे 12.86 चौ. मी. असलेले बांधकाम नियमीत करण्यासाठी त्यांचे वास्तुविशारद आर.जी. जहागीरदार यांनी बांधकाम नियंत्रण कार्यालयात हमीपत्र जोडुन अर्ज केला होता, त्यावर महापालिकेच्या इमारत निरिक्षक व सहायक अभियंता यांनी 5118 जावक क्रमांकाचा दाखला 2 जुलै 2007 रोजी दिला.या नियमितीकरण दाखल्याचा क्रमांक 68615 आहे.या दाखल्यानुसार खान यांचे या भूखंडामध्ये असलेले 12.86 चौरस मीटरचे बांधकाम, नियम व अटीनुसार नियमीत करण्यात आले होते.

खान यांना त्यांच्या सर्व्हे क्र 46 पोटी 2 जुलै 2007 रोजी रोजी जारी केलेल्या जावक क्र 5118 या दाखल्याचा परत बनावट दाखला व बनावट शिक्के मारुन बिलाल एस. कुरेशी, शादाब के. कुरेशी, जब्बार जी. शेख, जुबेर आय. सौदागर व वाहीद आय. सौदागर यांनी वास्तुविशारद योगेश एस. पाटील यांच्या मार्फत बांधकाम नियमीत करणे करीता प्रस्ताव सादर केल्याचे दाखवून खान यांच्याच 68615 या क्रमाकांच्या वैध दाखल्यात बदल करून, यावर महापालिकेच्या बांधकाम खात्याने 215603 क्रमांकाचा दाखला 18 ऑक्टोबर 2007 रोजी दिल्याचे दाखविले आहे त्या आधारे, हवेली नोंदणी उपनिबंधक 10 येथे नोंदविलेल्या 10127/2019 खरेदीखतातुन स्पष्ट झाले मात्र यात सर्वे क्रमांक 46 चे क्षेत्र 600 चौरस मीटर व नकाशामधील बांधकाम 1697.27 चौ. मी. असे दाखवण्यात आले आहे, यातील इसमांनी याच तारखेचा याच भूखंडाचा बनावट दाखला शिक्के मारुन जावक क्र 5118 परत तयार केला, याला 019192 क्रमांक दिला गेला, या वेळी ही मुळ क्षेत्र 600 चौरस मीटर दर्शवण्यात आले आहे व नकाशामधील बांधकाम 2470.29 असे नमुद करण्यात आले आहे.

वसंत नथोबा शेळके यांच्या कोंढवा खुर्द येथील सर्वे क्रमांक 60 करीता जावक क्र 1809 क्रमांक चा नियमितीकरणाचा 0042393 क्र चा दाखला 13 ऑगस्ट 2004 रोजी जारी केला, ज्यात शेळके यांचे मुळ क्षेत्र 202.42 चौ मी आहे व नकाशामधील बांधकाम 28.31 चौ मी आहे, शेळके यांच्या दाखल्याचा बनावट दाखला, बनावट शिक्के वापरुन आर. जी. शेख व डी. एन. शर्मा यांनी तयार केला, ज्यात शेळकेंच्या दाखल्याचा जावक क्रमांक तोच ठेऊन दाखला क्र 060293 असा दर्शवुन क्षेत्र बदलण्यात आले, या मध्ये भुखंडाचे क्षेत्र 200 चौ मी व नकाशामधील बांधकाम 912 चौ मी नमुद करण्यात आला आहे.

माहीती अधिकारात प्राप्त झालेल्या कागदपत्रातुन, प्रकाश चंद्रकांत हत्तुरे यांना 12 ऑगस्ट 2004 रोजी त्यांच्या कोंढवा खुर्द येथील सर्वे क्रमांक 4 जावक क्र 1801 चा 0033042 क्र दाखला देण्यात आला .या मध्ये भुखंडाचे क्षेत्र 100 चौ. मी. व नकाशामधील बांधकाम काहीच नसल्यामुळे मोकळा भुखंड असल्याची नोंद आहे. पण हत्तुरे यांच्या दाखल्याचा बनावट दाखला तोच जावक क्रमांक वापुरुन, सर्वे क्रमांक 51 करीता दिपक किशनचंद ननवाणी यांनी 0004128 क्रमांकाचा मिळवला, यात भूखंडाचे क्षेत्र 400 चौरस मीटर व नकाशामधील बांधकाम 1610 चौ. मी. असे नमुद करण्यात आले आहे.

महापालिका व ‘पीएमआरडीए’ मधील काही भ्रष्ट अधिकार्‍यांच्या संगनमताने, नगरसेवक, स्थानीक पोलीस, गुंड हे सर्व यात सामील असुन बनावट दाखल्यांच्या नियमीत करण्याचे दाखले तयार करणारी मोठी टोळी ही या सर्वांचे वाम मार्गाने भले करुन सरकार व महापालीकेचा शेकडो कोटी रुपयांचा महसुल बुडवुन कार्यरत आहे.

या बाबत महापालिकेचेे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या बरोबर अनेक वेळा संपर्क केला असता, संबंधीत अधिकारी आपल्याला संपर्क करतील, एवढेच त्यांनी सांगीतले. या वरुन या महाघोटाळ्याची कल्पना येते. प्राथमीक दृष्ट्या या सर्व बेकायदेशीर पद्धतीने बांधण्यात आलेल्या इमारती मधील हजारो परिवारांची करोडो रुपयांची फसवणुक झालेली आढळुन येत आहे. क्षमतेपेक्षा जास्त व कैक पटीने चटई क्षेत्र निर्देशांक (एफ एस आय) वापरल्यामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बाबत शेख यांनी अनेक तक्रारी संबंधीत यंत्रणांकडे केल्या आहेत पण पोलीस, महापालिका प्रशासन, सरकारला महसुल मिळणे करीता कोणतीही उपाय योजना करत नसल्याचे आढळुन आल्यामुळे बनावट दाखले तयार करणारर्‍या टोळीचे मात्र काम फोफावले आहे व महापालिका करोडो रुपयांच्या महसुलाला मुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे.

Share This
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top