Pune Crime

पुणे येथील ज्येष्ठ समाजसेवक विजयकांत कोठारी यांना “क्रांतिकारी समाजसेवी पुरस्कार”

IMG-20191019-WA0023

पुणे- १९ ऑक्टो २०१९ – विजयकांत कोठारी वयाच्या 75 व्या वर्षात पदार्पण करीत असून त्यांच्या प्रदीर्घ कार्याचा गौरव म्हणून अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून त्यांचा ‘जीवन गौरव-समारोह साजरा करून त्यात त्यांना “क्रांतीकारी समाजसेवी” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहेत. ओम अर्हम ग्रुप आणि सकल जैन समाजातर्फे त्यांना रविवार दिनांक 20 ऑक्टोबर 2019 रोजी वर्धमान सांस्कृतीक केंद्र, गंगाधाम कोंढवा रोड, पुणे येथे ‘क्रांतिकारी समाजसेवी‘ पुरस्काराने सन्मानित केले जात आहे. जैन धर्मियांच्या दिगंबर, श्‍वेतांबर, स्थानकवासी आणि मंदिरमार्गी या सर्व पंथातील बांधवांचे विजयकांत कोठारी हे जैन समाजातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व असून ते आदराचे स्थान आहेत.

अर्हम ग्रुप या समाजसेवी संस्था सकल जैन संघ व विजयकांत कोठारी जीवन गौरव समारोह समिती तर्फे विजयकांतजींचा गौरव केला जात आहे. सदरचा पुरस्कार न्यायमुर्ति पुखराजजी बोरा, उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या हस्ते व शांतीलालजी कवार व पद्विभूषण डॉ. के. एच. संचेती यांच्या प्रमुख उपस्थितीत देणार आहे. जैन समाजातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व असलेल्या कोठारींचा सन्मान म्हणजे एका अर्थाने समाजकार्याचाच सन्मान आहे.

मूळचा समाजसेवेचा पिंड असल्याने विजयकांतजी तरुण वयातच समाजकार्यात दाखल झाले. त्यांनी उभारलेले समाजकार्याचे प्रकल्प आदर्श आहेत. साधना सदन, महावीर प्रतिष्ठान, मुलींसाठींचे स्वतंत्र वसतीगृह, शाळा, जैन धर्मियांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी अशा अनेक उपाक्रमांमागे विजयकांत कोठारी आहेत. याशिवाय मागील चाळीसपेक्षा अधिक वर्षे ते जैन धार्मिक कार्यात अग्रणी आहेत. त्यांच्या पुढाकाराने अनेक चातुर्मासांचे आयोजन पुणे शहरात झालेले आहे. कोठारी कुटुंब मूळचं राजस्थानचं. व्यवसायासाठी कै. मोतीलाल कोठारी पुण्यात आले आणि त्यांनी अनेक व्यवसाय यशस्वीपणे सुरु केले आणि विस्तारले. ऑटोमोबाईल, ट्रान्स्पोर्ट आणि बांधकाम व्यवसायात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.विजयकांत यांनी ड्राफ्टसमचा अभ्यासक्रम पूर्ण करुन बांधकाम व्यवसायात रुजु झाले आणि त्यांनी तो व्यवसायही नावारुपाला आणला.

विजयकांतजींना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. समाजभूषण, समाजरत्न, जैन समाजभूषण, जीतो पुणे पुरस्कार, जैन दीपस्तंभ अशा डझनभर पुरस्कारांनी त्यांना आजवर सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी त्यांच्या आजवरच्या आयुष्यातील सर्वाधिक काळ समाजकार्यात घालविला आहे. अनेक आदर्श संस्था केवळ त्यांच्यामुळेच उभा राहिल्या आहेत आणि उत्तम प्रकारे सुरु आहेत. श्री. कोठारी म्हणजे एका अर्थाने जमीनीवरचा कार्यकर्ता आहे. कोणतंही काम कमी प्रतीचं नाही असं समजून समाज कार्य करताना त्यांनी अनेक वेळा स्वत: झाडू हाती घेतला आहे.

कोठारी मागील पन्नास वर्षांहून अधिक काळ समाजकार्यात आहेत. त्यांनी केलेले समाजकार्य प्रचंड मोठे आहे आणि अनेक क्षेत्रात विस्तारलेले आहे. विजयकांतजींचं कार्य केवळ जैन धर्मियांपुरतं मर्यादित नाही. एक विशाल दृष्टीकोन असल्याने समाजातल्या सर्व जाती धर्मांच्या जनतेसाठी त्यांनी खूप मोठं कार्य केलं आहे. जैन धर्मियातील गोरगरीबांसाठी तर विजयकांतजी नेहमीच पुढे राहिलेले आहेत. ज्यावेळी एखाद्या कुटुंबात मृत्यु होतो त्यावेळी मृताचे अंत्यसंस्कार सन्माननीय पध्दतीनेच झाले पाहिजेत असा त्यांचा आग्रह असतो आणि ते तसा तो घडवून आणतात. त्यांनी आजवर हजारो अंत्यविधींमधे आपला सहभाग दिला आहे. विजयकांतजी म्हणजे निष्काम कर्मयोगाचा वस्तुपाठ आहेत. आपण काम करत राहायचं. त्यातून कशाची अपेक्षा ठेवायची नाही ही वृत्ती असल्यामुळे त्यांच्याविषयी समाजात एक मोठा आदर्श निर्माण झाला आहे. sdj/pun/20 oct 2019,

Share This
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top