पुणे – २८ फेब २०२० — पोलीस आयुक्त डाॅ के वेंकटेशम यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीकरीता उभारलेल्या ज्या “”भरोसा”” कार्यलयाच्या टीमक्या सद्या पोलीस वाजवत आहे, त्याला हरताळ फासण्याचा उद्योग पोलीसदलातील अनेक अधिकारी करत आहे.
शहर पोलीसदलातील एका महीला अधिका~याला, कर्तव्यावर असताना पोलीसाच्याच फोन वरुन सुनील नानासाहेब करपे राहणार वडगाव शेरी पुणे, या तथाकथीत मोटीवेशनल स्पिकर व स्वताचा बांधकाम व्यवसाय असल्याचे भासवुन ज्ञानदा कंस्ट्रक्शन कंपनीच्या नावाने नागरीकांकडुन लाखो रुपये फसवुन गोळा करणा~याने, अतिशय घाणेरड्या व अश्लील शिवीगाळ १८ ऑक्टोबर २०१९ रोजी केली. या महीला अधिका~याला त्याच्या उबाळेनगर, वाघोली येथील प्रकल्पात सदनिका देतो असे सांगुन लाखो रुपये धणादेशाद्वारे घेतले, पण सांगीतलेल्या ठीकाणी अनेक वर्ष कोणतेही बांधकाम सुरु झाले नाही म्हणुन या महीला अधिका~याने तीचे पैसे परत मागीतले, त्यामुळे या बांधकाम व्यावसाईकाने राजु परदेशी नावाच्या पोलीसाच्या फोन वरुन ही शिविगाळ केली.
त्यामुळे महीला अधिका~याने येरवडा पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल करण्यास सांगीतले. मात्र तेथील पोलीस अधिका~याने महीलेलाच अपमान करुन हाकलुन दिले, या मुळे महीलेने पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्याचे ठरवले, दरम्यानच्या काळात ही बाब एका पत्रकाराने संबंधीत विभागाच्या पोलीस उपायुक्त व एका अति वरिष्ठ पोलीस अधिका~याच्या कानावर घातली. घटनेचे गांभीर्य ओळखुन वरिष्ठांनी महीला अधिका~याच्या तक्रारीची माहीती घेतली व तक्रारीत तथ्य आढळ्याने पोलीस उप-आयुक्तांनी येरवडा पोलीस निरिक्षकांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश केले.
मात्र वरिष्ठांचे सर्व आदेश पायदळी तुडवुन, बांधकाम व्यावसाईकाकडुन झालेल्या “अर्थपुर्ण तडजोडी” मुळे येरवडा पोलीसांनी, माहीती तंत्रध्यान ची कलमे वगळुन, फक्त ५०९ व ५०६ अशी जुजबी कलमे लावुन ११ फेब २०२० रोजी रात्री साडे दहा वाजता गुन्हा दाखल केला. यात ज्या फोन वरुन या महीला अधिका~याला शिविगाळ करण्यात आली त्या पोलीसाला व या बांधकाम व्यावसाईकाला आज पर्यंत साधी अटक करण्याचे धाडस येरवडा पोलीसांनी अध्याप दाखवले नाही.
एकीकडे पोलीस आयुक्त नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम सुरु करत आहे, दुसरीकडे यांचेच अधिकारी त्यांच्याच खात्यातील महीला अधिका~याला तक्रार दाखल करण्यास ४/४ महीने लावत आहे. पोलीसांच्याच तक्रारीला खो घातला जातो तीथे सर्वसामान्य नागरीकांना कोण न्याय देणार, कोनावर “भरोसा” ठेवायचा? असा प्रश्न आता नागरीक विचारु लागले आहेत.
या बाबत ज्येष्ठ विधिज्ञ अभिजीत बीडकर यांनी सांगीतले की, पोलीसांनी या प्रकरणात अतिशय कठोर कारवाई करणे अपेक्षीत होते कारण शिविगाळ केल्याचे रेकाॅर्डींग हा मोठा पुरावा त्यांना मीळाला होता व ज्या फोनवरुन शिविगाळ झाली तो जप्त करणे आवश्यक होते.
