पुणे – महिला सुरक्षेच्या टिमक्या वाजवणाऱ्या पोलिसानी, एका महिलेच्या समोर तीचे पती व एक वर्षाच्या मुलाच्या अपहरण केल्या बाबत व तिच्या घराचा जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्या बाबतच्या तक्रारीचे अक्षरशः धिंडवडे काढले असल्याचा आरोप युवा सेनेच्या, युवती जिल्हा समन्वयक, मनीषा धारणे यांनी लगावला आहे.
या बाबत अधिक माहीती देताना धारणे यांनी सांगीतले की, आंबेगाव, येथील लेक विस्टा येथे राहणाऱ्या एका महीलेच्या डोळ्यादेखत तिचे पती व एक वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्यात आले, त्या आधी त्या महीलेच्या घराचा जबरदस्तीने कब्जा घेण्याचा प्रयत्न याच आरोपींनी केला होता. त्या बाबत महिलेने त्वरित 100 क्रमांकावर फोन करून पोलीस नियंत्रण कक्षात कळवले होते,.त्यानंतर महिला भरती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेल्या असता सादर अपहरणकर्ते तिच्या अगोदरच वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत कुवर यांचे बरोबर त्यांच्या कार्यालयात गप्पा मारत बसल्याचे दिसून आले, सदर महिलेने तिची तक्रार सांगण्यास सुरुवात करताच पोलीस निरीक्षक वसंत कुंवर यांनी अपहरणकर्त्यांना एक कोटी पंचवीस लाख रुपयांचा धनादेश देण्यास सांगितले, यावर महिला खूप घाबरली व तिने धारने यांना मदतीसाठी बोलावले. धारने यांनी पोलीस निरीक्षकांना महिलेची तक्रार दाखल करण्यास सांगितले असता निरीक्षकांनी त्यांनाच अपमानित करून हाकलून दिले,व आरोपीं विरोधात तक्रार नाही असे लिहून देण्यास सांगितल्याचे, धारणे म्हणाल्या.
धारणे यांनी थेट उप-मुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे येथे समक्ष भेटून सर्व प्रकार सांगितला, पवार यांनी उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांना त्वरित फोन करून गुन्हा दाखल करण्यास सांगितले, मात्र ३ दिवस चकरा मारून भारती विद्यापीठ पोलिसांनी जुजबी कलमे लावून यातील काही आरोपींवर गुन्हा दाखल केला त्यात प्रकाश आत्माराम पडावे रा. ठाणे, संतोष गणपत थोपटे रा. ठाणे विमला परमार व जयेश पाडवे ,पत्ता माहीत नाही, यांचे विरोधात 8 फेब 2020 कलम 365,511,323,504 व 34 नुसार गुन्हा दाखल केला, मात्र अद्याप पर्यंत पोलिसांनी एकही आरोपीला अटक केली नाही अथवा टोयोटा इंनोवा MH 48 P 9037 हे वाहन जप्त करण्याची कारवाई केलेली नाही.
सदर तक्रार दाखल करणेकरीता महीला जवळपास ६ दिवस रोज १०/१२ तास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात बसत होती, एवढा गंभीर प्रकार घडुनही पोलीस उपायुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अथवा या पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पुरुष व महीला पोलीस उप निरिक्षकांनी पदोपदी महिला व तिच्या पतीला अपमानीत केल्याचा गंभीर आरोप धारणे यांनी लगावला आहे व त्या बाबत लेखी पत्राद्वारे त्यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना तक्रार केली आहे.
