महीला सुरक्षेचे धिंदवडे पिटणारे पोलीस, करत आहे गुन्हेगारांना मदत
दिवसाढवळ्या ज्येष्ठ महीलेला मारहाण करुन बंगला ताब्यात घेण्याचा प्रयत्न
सहायक पोलीस आयुक्तांच्या कर्तव्य तत्परतेने झाला गुन्हा दाखल
पुणे देवेंद जैन : महीलांना योग्य तो न्याय मीळणेकरीता महीला सुरक्षेचे धिंदवडे पिटणारे पोलीसांनी बेकायदेशीरपणे बंगल्याचा ताबा घेणा~या व तक्रारदार महीलेला जबर मारहाण करणा~या गुन्हेगारांना मदत केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे, मात्र तत्तपरतेने सहायक पोलीस आयुक्तांनी दखल घेतल्यामुळे संबंधीतांवर भारती विद्यापीठ पोलीसांनी जुजबी कलमे लावुन मामला रफादफा करण्याचा प्रयत्न केला आहे.
भावना संजय वोरा या ज्येष्ठ महीलेने अविनाष आबासाहेब जमाले पाटील, त्यांची पत्नी शुभांगी मुलगा कौस्तुभ व मुलगी कस्तुरी यांचे कडुन एक कोटी चाळीस लाख रुपये देउन त्यांचा राहता बंगला व दुकान खरेदी केले. जमाले पाटील यांचेवर श्रीराम फायनान्स बँकेचे कर्ज थकले होते व सदर बंगला बँकेने जप्त करुन विक्री करण्याचे ठरवले होते. त्यावेळी जमाले पाटील यांनी वोरा व त्यांचे पतीला पैसे बँकेत भरुन बंगला व दुकान तुम्हीच विकत घ्या अशी गळ घातली. त्यानुसार वोरा यांनी जमाले पाटील यांचे सर्व थकीत कर्ज भरण्याचे ठरवले व मार्च २०१९ मध्ये श्रीराम फायनान्स बँकेत चेकने पैसे भरुन रितसर ताबा घेतला. त्याच दिवशी जमाले यांच्या वकिलांनी तयार केलेले खरेदीखतावर सर्वांनी सह्या केल्या व नोदणी करून देतो असे कबुल केले. त्यानुसार वोरा यांनी सदर बंगल्या चा ताबा घेऊन राहण्यास सुरुवात केली व दुकानाला स्वताचे कुलूप लावले.
जमाले पाटील खरेदीखत नोंदवण्यास टाळाटाळ करु लागले व १० जानेवारी २०२० रोजी काही गुंड प्रवृत्तीच्या ईसमांना बेकायदेशीरपणे बंगल्यात घुसवुन भावना वोरा यांचा विनयभंग करुन जबर मारहाण केली व ताबा घेण्याचा प्रयत्न करु लागले. त्यावेळेस त्यांच्या पतीचा फोन आला व भावना यांनी फोन सुरुच ठेवल्यामुळे त्यांचे पतीला घरात काहीतरी गडबड सुरु असल्याचे लक्षात आले, त्यांनी त्वरीत १०० क्रमांकावर फोन केला व काहीवेळात भारती विद्यापीठ पोलीस तेथे पोचले.
पोलीसांनी सर्व बंगल्याचे शुटींग करुन सर्वांना पोलीस ठाण्यात घेउन गेले. तो पर्यंत त्यांचे पतीही तेथे पोचले. सर्व प्रकरणाची माहीती घेउन वोरा यांनी तक्रार दिली,मात्र पोलीसांनी फक्त ”अदखलपात्र” गुन्हा नोंदवणार असे वोरा यांना सांगीतले. दिवसाढवळ्या ज्येष्ठ महीलेचा विनयभंग व जबर मारहाण करुन बंगल्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न जमाले पाटील व त्यांच्या बरोबरच्या गुंडांनी केलेला असताना गुन्हा दाखल करण्याएैवजी फक्त अदखल पात्र गुन्हा पोलीस नोंदवत असल्याचे पाहुन वोरा पती पत्नींच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, कारण भारती विद्यापीठ पोलीस आरोपींना उघडपणे मदत करीत असल्याचे आढळुन आले. त्यामुळे वोरा खुप घाबरले व पी सी पी न्युज च्या कार्यालयात पोचले व उपस्थीत प्रतिनिधी समोर आपली व्यथा व पोलीसांकडुन सुरु असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. दुस~या दिवशी सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर यांना भेटुन, सर्व प्रकार सांगीतला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन बाबर यांनी त्वरीत भारती विद्यापीठ वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यास सांगीतले.
अखेर १५ जानेवारी रोजी पोलीसांनी जमाले पाटील परिवारावर, भा द वि नुसार कलम ३२३,५०६,४४८,४५२ व ३४ नुसार गुन्हा दाखल केला व अध्याप कोणालाही अटक केली नाही. तसेच गुन्ह्यात सामील असलेल्यांवर कठोर कार्रवाईची कलमे न लावता तसेच ईत्तर गुंडांची नावे वगळण्यात पोलीस यशस्वी ठरल्याचा गंभीर आरोप भावना शहा यांनी लगावला.
