“”मुस्कान”” च्या आयुष्यात आज बडतर्फ पोलीसामुळे उगविला सोनियाचा दिवस
*आज ख~या अर्थाने तीने केली “ईद”” साजरी*
*पायाची उणीव भरुन काढली ईलेक्ट्रीक व्हील चेयरने*
पुणे : जन्मता पाया ने अधु असलेल्या मुस्कान मुबारक सय्यदने आज ख~या अर्थाने “”ईद”” साजरी केली. आजचा दिवस तीच्यासाठी सोनियाचाच म्हणावा लागेल.
वडील रिक्शाचालक, आई पोलीस व दोन मुली, संसाराचा गाडा रडत खडत सुरु आहे, त्यात एक मुलगी अपंग, तीचे करकरता आईच्या नाकीनउ यायचे, जसे तीचे वय वाढु लागले तश्या अनेक समस्या निर्माण होउ लागल्या, पण न डगमगता झरीना, प्रतेक संकटाला सामोरे गेल्या, मुलीला आता उचलताना त्यांचे पाय थरथरु लागले, आर्थीक समस्या तोंड वासुन उभ्या ठाकु लागल्या, मुलीला तर आय पी एस व्हायचे पण पैसा कोठुन आणणार, मुलीला बी बी ए च्या शिक्षणासाठी आझम कँम्पस मध्ये प्रवेश घेतला, पण रोज समर्थ पोलीस लाईन ते आझम कँपस मध्ये उचलुन न्यावे लागत असे. या करीता गरज होती एका यांत्रीक चाकाच्या खुर्चीची (ईलेक्ट्रीक व्हील चेअर), किंम्मत एैकुणच झरीना यांना झटका बसला, पण मुलीला शिक्षणाची मोठी हौस. ही समस्या घेउन त्या नुकत्याच बडतर्फ केलेल्या शैलेश जगताप यांचे कडे गेल्या.
जगतापांना मुलीचे एैकुणच खुप वाईट वाटले व त्यांनी झरीना यांना आधार दिला व मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. दोनच दिवसात त्यांनी आपला पुतण्या जयेश याला ईलेक्ट्रीक व्हील चेअर घेण्यास सांगीतले. जयेश ने लगेचच ईलेक्ट्रीक व्हील चेयर ची माहीती घेउन थेट खरेदी केली.
कै. जितेंद्र जगताप यांचे स्मर्णार्थ व काकांच्या वाढदिवसाची भेट म्हणुन घरगुती कार्यक्रम करुन, मुस्कानला आज ही ईलेक्ट्रीक व्हील चेअर देण्यात आली. त्यावेळी मुस्कान, तीची आई व बहीणीच्या डोळ्यात आनंद आश्रु वाहु लागले. आता मुस्कान ही व्हीलचेयर स्वता चालवुन तीच्या काँलेजला जाणार आहे.
याच बडतर्फ पोलीसाने मागील वर्षी एका वयोवृद्ध महीलेची व चित्रपट अभिनेता सलमान खान यांची भेट घडवुन आणली होती. एका खोट्या प्रकरणात या कर्मचार्याला पोलीस सेवेतुन बडतर्फ करण्यात आले आहे, मात्र समाजाची बांधीलकी न विसरता आपले काम सुरुच ठेवले आहे
