Pune Crime

“कोरोना” च्या नावावर सुरु आहे सर्वसामान्यांची लुट — जीवनावश्यक वस्तुंचा सुरु आहे काळाबाजार — कृषी उत्पन्न व घाउक बाजार बंदचा फायदा घेत आहे व्यापारी व भाजी विक्रेते — थेट “”ग्राउंड रिपोर्ट”” बाजारातुन.

carona

पुणे देवेंद्र जैन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपु्र्ण देश १५ एप्रिल २०२० पर्यंत लाॅकडाउन केल्या नंतर जीवनावश्यक वस्तुंचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु असल्याचे दिसुन येत आहे त्यात बाजार समीत्यांनी भाजी व घाउक बाजार बंद ठेउन त्यात भर घातली आहे.

यामुळे देशातील मोठी लोकसंख्या असलेला मघ्यमवर्ग मोठ्या प्रमाणात भरडला जात आहे. भाजीपाला व किराना मालाची आवक होत नसल्यामुळे सर्वच वस्तुंचे भाव गगनाला भीडले आहेत. जीवनावश्यक वस्तुंची दुकाने उघडी ठेवावीत, असे प्रशासन रोज जाहीर करत आहे, मात्र आवक नसल्यामुळे बहुतेक दुकानातील किराना संपत असल्याचे दिसुन येत आहे. प्रतेकजण मालाचा साठा मोठ्या प्रमाणात करत आहे, तुर्त फक्त दुध पुरवठा सुरळीत आहे. कांदा, बटाटा, पालेभाज्या, फळभाज्यांचे दर तर “”मुंहमांगे”” दाम आहेत. डाळ, साखर तेल, तुप, कड धान्यांचे दर तर खिशाला परवडणासे झाले आहेत. मालाची आवक पुर्णपणे बंद असल्यामुळे सामान्य नागरीकांचे प्रचंड हाल सुरु आहेत, गॅस सिलंडर चे दर १५०० रुपयाच्या पुढे गेलेत, त्यामुळे जनता हवालदिवाल झाली आहे. सरकार म्हणते घराबाहेर पडु नका, मग खाणार काय असा प्रश्न नागरीक विचारत आहे. वैद्यकिय सेवा पुरवणारे काही व्यावसाईक ग्राहकांची अडवणुक करत आहे व जास्ती पैसे घेत असल्याच्या तक्रारी नागरीक करत आहे.

या बाबत मार्केट यार्ड मधील एका व्यापा~याला संपर्क केला असता, त्यांनी दिलेली माहीती अतिशय गंभीर आहे, त्यांच्यानुसार जर जीवनावश्यक वस्तुंची आवक योग्य प्रमाणात, कोणतीही आडकाठी न आणता झाल्यास, लाॅकडाउन, कितीही दिवस केले तरी नागरीक सहकार्य करतील, कोणीच बाहेर येणार नाही. या करीता जिल्हाधिकारी, पोलीस व प्रशासनात संमन्वय आवश्यक आहे, बाहेरील राज्यातुन पुरवठा करणा~या वाहनांना संरक्षण देणे गरजेचे आहे, तरच नागरीकांची गर्दी होणार नाही, आत्ताच्या परिस्थीती मध्ये सगळ्यांना भीती वाटत असल्यामुळे, नागरीक सर्वच वस्तुंचा मोठा साठा करत आहे व त्याचा फटका ईत्तरांना बसत आहे.

ग्रामीण भागातील नागरीकांची मोठी ससेहोलपट होत आहे. जिल्ह्यातील अनेक पांजरपोळ संस्थेतील जनावरांना चारा मीळत नाही, दुध वितरण करणा~यांना पोलीसांच्या दंडुक्याची भीती वाटत असल्यामुळे ते घाबरतच वितरण करत आहे.

प्रशासनाने यावर त्वरीत उपाय योजना करुन व काळाबाजार करना~यांवर कठोर कारवाई करावी व ईत्तर खात्यां बरोबर योग्य समन्वय साधुन, नागरीक बाहेर न पडता, त्यांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याची मागणी, नगरसेवक शंकर गनपत पवार यांनी केली आहे.

Share This
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top