न्यायाधिशांच्या निर्णयामुळे शेतकरी परिवार वाचला आत्महत्येपासुन
सांस्कुतीक राज्यात अजुनही टाकला जात आहे बहीष्कार
खाजगी सावकारकीच्या चक्रव्युहात अडकला शेतकरी
आरोपींनी कट करुन टाकला होता सामाजीक बहीष्कार
लोणीकंद ग्रामीण पोलीसांच्या व वरिष्ठ अधिका~यांच्या अनास्थेला कंटाळुन करणार होते आत्महत्या
पुणे — शेतकरी आत्महत्या हा राज्याला लागलेले मोठे दुखणे, यातुन शेतक~याला बाहेर कसे काढता येईल या करीता सर्वच राजकीय पक्ष व सरकारे अनेक योजना राबवत आहेत, मात्र सरकारी व पोलीस अधिका~यांच्या अनास्थेला कंटाळुन अनेक शेतकरी कुटुंब प्रमुखांनी आपले जिवन संपवले आहे. शेतकरी मुख्यत: अडकतो खाजगी सावकरी व नापीकीला, यात सावकरी चे चक्रव्युह मोठे असल्याचे अनेक घटनांमधुन दिसुन आले आहे. ऑक्टोबर २०१४ ते ऑगस्ट २०१९ अखेर १४५९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती, माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेत्तीवार यांनी सुरु असलेल्या अधिवेशनात दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील वाघोली जवळील आव्हाळवाडी येथील शेतकरी मल्हारी बबन सातव याने गावातील एका खाजगी सावकाराकडुन २० लाखाचे कर्ज घेतले होते व या कर्जापोटी त्याने मुद्दल रक्कम अदा करुन लाखो रुपये व्याज या सावकाराला दिले होते. मात्र सावकाराने परत त्याचेकडुन दमदाटी, मारहाण, धाकटपशा दाखवुन जबरदस्तीने आगावु धनादेश घेतले, तसेच गावामध्ये त्याच्या पुर्ण परिवारावर बेकायदेशीरपणे दवंडी पिटवुन सामाजीक बहीष्कार टाकला होता. या बाबत या शेतक~याने लोणीकंद पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या. पोलीस काहीच कारवाई करत नसल्यामुळे त्याने परिवारासहीत गाव सोडले होते. पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांना भेटुन लेखी तक्रारी अर्ज दिले होते. मात्र सावकर व त्याच्या सहका~यांवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही . या बाबत त्याने पुणे येथील न्यायालयात दाद मागीतली होती. त्यावर सुनावणीअंती न्यायाधिश ए एस मुजुमदार यांनी सर्व आरोपीं विरोघात तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तक्रादाराच्या वतीने वकील श्रीनिवास मोरे यांनी वस्तुस्थीती मांडली.
न्यायालयाने आरोपी नारायण गुलाबराव आव्हाळे, सोमनाथ तांबे, हौसाबाई आव्हाळे, रोहीत आव्हाळे, काळुराम आव्हाळे, प्रशांत राजेश म्हस्के, ज्ञानेश्वर सदाशिव सातव, मुक्तकीन शेख, आबासाहेब रामदास हरपळे, प्रविण रामदास आव्हाळे व सुरेश शिवराम सातव यांचे विरोधात भारतीय दंडविधान कायद्या कलम ३२३,३२४,५०४,५०६,४५२ सह ३४ नुसार गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिलाआहे. न्यायालयाने २६ फेब्रुवारी २०२० रेजी निकाल देउन सुद्धा लोणीकंद पोलीसांनी अध्याप कोणत्याही आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखवले नाही.
