Pune Crime

पन्नास लाखाची खंडणी दिली नाही म्हणुन पोलीस उप-निरिक्षकाला अडकावले बलत्काराच्या गुन्ह्यात== खंडणीचे सर्व पुरावे देउनही तक्रार दाखल होत नव्हती== अति वरिष्ठ अधिका~यांचा मोठा हस्तक्षेप== उच्च व सर्वोच न्यायालयालाही जुमानात नाहीत अधिकारी== महीला व तीच्या साथीदारांवर गुन्हा दाखल.

LOGO OF Maharashtra Police

पुणे १६ मार्च २०२०: शहर पोलीसदलात उप निरिक्षक पदावर कार्यरत असलेल्या दत्तात्रय राजाराम मदने यांचे विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात २ फेब २०१९ रोजी कलम ३७६,४१७,३२३,५०६ (२) नुसार बलत्काराचा गुन्हा दाखल झाला व त्यांना तात्काळ सेवेतुन निलंंबीत करण्यात आले व तपासकामी सदर गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने मदने यांना अटकपुर्व जामीन देताना त्यांचे म्हणने एैकुन, यात दाखल केलेले कलम ३७६, हे शंकास्पद असल्याचे न्यायाधिषांनी नमुद करुन त्यांना जामीन दिला. मदने यांना जामीन मीळाल्याचे कळताच या कटात सामील असलेल्या काही पोलीस अधिका~यांचा तीळपापड झाला कारण सदर गुन्हा हा पुर्णपणे शंकास्पद असल्याचे आढळुन आले होते.

मदने यांचे वर गुन्हा दाखल करणे अगोदर सदर महीलेने पन्नास लाख रुपयांची खंडणी मागीतल्याचे व न दिल्यास त्याला बलत्काराच्या गुन्ह्यात अडकावणार, अशी फोनवरून मदने यांना धमकी दिल्याचे सर्व पुरावे पोलीसांकडे देउनही पोलीस काहीही कारवाई करत नव्हते. या बाबत मदने यांनी सर्व वरिष्ठ पोलीस अधिका~यांचे उंबरठे झीजवले व शेवटी ३ जानेवारी २०२० रोजी भारती विध्यापीठ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. तरीही पोलीस कारवाई करत नसल्यामुळे त्यांनी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण येथे पोलीसांच्या विरोधात तक्रार दाखल केली. प्राधिकरणाने मदने यांच्या तक्रारीवर पोलीसांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मागवला व पोलीसांच्या पायाखालची वाळु सरकली व १५ मार्च २०२० रोजी रात्री ११ वाजता पोलीसांनी सोनाली मनोज सोनवणे, राहुल भगवान वेताळ, रत्नमाला भगवान वेताळ, मालन गणेश पवार व विकास ईश्वर तुपे यांचे विरोधात भा द वि कायद्यातील कलम ३८६,३८७,५०४,५०६ व ३४ नुसार या सर्व आरोपींवर गुन्हा दाखल केला.

या बाबत पुणे क्राईम पॅट्रोल च्या प्रतिनिधी बरोबर बोलताना मदने म्हणाले की, मी पहील्या दिवसांपासुन संबंधीत पोलीस अधिका~यांना, महीला करत असलेली तक्रार खोटी आहे, ती मला ब्लॅक मेल करत आहे, पण माझे म्हणने कोणीही एैकले नाही, माझ्यावर खुप मोठा अन्याय झाला, मला निलंंबीत केल्यानंतर सुद्धा पोलीसांची मनमानी सुरुच आहे, सर्वोच न्यायालयाने दिलेव्या निकाल नुसार माझी विभागीय चौकशी सुरु करुन तीन महीन्याच्या आत मला दोषारोपत्र देणे बंधनकारक असताना सुद्धा, पोलीसांनी १ वर्षा नंतर सुद्धा दिलेले नाही, तसेच मला अटकपुर्व जामीन देताना, न्यायाधिषांनाही सदर तक्रार संशयास्पद वाटली व तसे त्यांनी आपल्या आदेशात नमुदही केले. मी तर आत्महत्या करणार होतो मात्र एका पत्रकाराने मला धीर दिला अन्यथा मी निर्दोष असुनही माझा जीव गेला असता.

या बाबत संबंधीत पोलीस ठाण्यात चौकशी केली असता अध्याप कोणालाही अटक केली नसल्याचे सांगण्यात आले.

Share This
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top