पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखे ने पकडली ६ देशी पिस्तुले
सराईत गुन्हेगाराने विक्री करणे करीता आणली शहरात
दक्ष पोलीसामुळे उघडकीस आला प्रकार
पुणे : शहरात बेकायदीऱ हत्यारे व पीस्तुलांचे पेव फुटले असताना, गुन्हे शाखेत्या एका दक्ष कर्मचा~यामुळे, एका सराईत गुन्हेगाराकडुन विक्री करणे करीका आणलेल्या देशी पीस्तुलांचा मोठा साठा पकडण्यात यश आले.
पोलीस आयुक्त डाॅ के वेंकटेशम यांनी शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधीत राखणे व गुन्हेगारांच्या हालचालींवर विवीध उपाय सुर केले आहेत व त्याला काही प्रमाणात यश मीळत आहे. गुन्हे शाखा क्रमांक ४ मधील पोलीस हवालदार सुनील पवार यांना गुन्हे कार्य प्रणालीच्या अभिलेखावरील दोन गुन्हेगार, रास्ता पेठ येथे मोठा शस्त्र साठा विक्री साठी घेउन येणार असल्याची माहीती मीळाली. पवार यांनी वरिष्ठ पोलीस निरिक्षक अंजुम बागवान यांना त्वरीत सदर बाब कळवली. त्यानुसार वरिष्ठांचे मार्गदर्शन घेउन सापळा रचण्यात आला. सदर ठीकाणी काही व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली दिसल्यावर पथकाने त्यांना त्वरीत ताब्यात घेउन त्यांची झडती घेण्यात आली असता त्यांच्या ताब्यातुन २ गावटी पिस्टल व ३ काडतुसे मीळुन आली. त्यांची ओळख पटवली असता ते अभिलेखावरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. रोहन उर्फ दुध्या सुभाष चव्हाण, वय ३३, रा. दारुवाला पुल, सोमवार पेठ व चंद्रशेखर रामदास वाघेल, ३० रा. मुकुंदनगर पुणे, त्यांना गुन्हे शाखेत नेण्यात आले व पुडील चौकशी मध्ये अणखि ४ पिस्टल व ९ काडतुसे मीळुन आली. त्यांच्याकडुन एकुण ६ पिस्टल व १२ जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
चव्हाण याला २०१६ मध्ये संधवा मध्य प्रदेश येथे ८ पीस्टलसह पकडण्यात आले होते. त्याला या आधी समर्थ पोलीसांनी अग्निशस्त्रांच्या संदर्भात अटक केली होती. त्याच्यावर एकुण २३ गुन्हे पुणे येथे व १ गुन्हा मध्य प्रदेश मध्ये दाखल आहेत.
या तपासाकरीता गुन्हे शाखेचे अति आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बचन सिंह, सहा आयुक्त विजय चौधरी यांना वरिष्ठ पोलीस निरिक्षक बागवान, उप निरिक्षक विजय झंजाड, कर्मचारी सुनील पवार, सचिन ढवळे, अतुल मेंगे, निलेश शिवतरे, विशाल शिर्के, राकेश खुणवे, दत्कात्रय फुलसुंदर, गणेश साळुंखे, भालचंद्र बोरकर, सुहास कदम, राजु मचे, अशोक शेलार,, शंकर पाटील व शितल शिंदे, यांना मार्गदर्शन केले.
