Pune Crime

लाॅक डाऊनच्या भीतीने परप्रांतीयांचे जीव धोक्यात- बेकायदेशीरपणे करत आहेत प्रवास- सरकारने त्वरीत दखल घेण्याची गरज- वैद्यकिय तपासणी करुन गावाला पाठवण्याची विनंती

carona
पुणे पीसीपी न्युज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा संसर्ग पसरु नये या करीता १४ एप्रिल २०२० पर्यंत देश लाॅकडाउन जाहीर केल्यानंतर, राज्यातील परप्रांतीयांचे हाल सुरु आहेत. जो तो बेकायदेशीर मार्गाने आपल्या ईच्छीतस्थळी पोचण्याचा प्रयत्न करत आहे. काहींनी तर महामार्गावर चक्क पायी प्रवास सुरु केले आहेत.

आज एका अपघातामध्ये पायी चालणाऱ्या ४ जणांचा मृत्यु झाला आहे. काही ठिकाणी पोलीसांनी पकडलेल्या कंटेनर व ट्रकमधून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाश्यांना ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे आता गावी पोचण्याकरीता चक्क रीकाम्या दुध व गॅस टँकर चा वापर केल्याचे उघडकीस आले आहे. ट्रक, टेंम्पोमध्ये प्रवाश्यांना श्वासोच्छ्वासासाठी हवा कशी मिळत असते ते समजत नाही. अर्थात सर्वात धोकादायक म्हणजे दुध व गॅसटँकर मधून प्रवास करणाऱ्यांचा जीव धोक्यात घातला जात आहे. यामध्ये आत बसलेल्या प्रवाश्यांना हवा मिळण्याची कोणतीही सोय नाही, तसेच यात जीव गमावण्याची मोठी शक्यताही असते असे मत याविषयातील तज्ञ व्यक्त करत आहेत. थोड्या पैशांकरीता या वाहानांचे चालकांनी अनेकांचा जीव वेठीस धरल्याचे दिसून येत आहे.

या बाबत बोलताना, नाव न छापण्याच्या अटीवर एका डाॅक्टरांनी एक सूचक विधान केले. त्यांच्यानुसार ज्यांना आपल्या गावी जायचे आहे, अशा प्रवाश्यांची वैद्यकिय तपासणी करुन, आणि जर त्यांना कोणताही संसर्ग नसल्याचे सिद्ध झाल्यास, संबंधीत क्षेत्राच्या जिल्हाधिकारी यांच्याबरोबर समन्वय साधून, अशा प्रवाश्यांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यास हरकत नसावी. यामुळे कोणत्याही नागरीकांचा जीव जाणार नाही अथवा संसर्ग पसरणार नाही, अन्यथा अशा बेकायदेशीर मार्गाचा वापर हे परप्रांतीय करत राहतील.

बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, बंगाल, गुजरात, राजस्थान येथील लाखो परप्रांतीयांना लाॅकडाउन असल्यामुळे आपल्या मूळ गावी जावयाचे आहे. त्या सर्वांनी अश्या वैद्यकिय चाचणीस तयारी दर्शवली आहे, मात्र अशिक्षित असल्यामुळे त्यांना कोणतेही मार्गदर्शन होत नाही व चुकीचा मार्ग पकडून ते गावी जाण्याच्या तैयारीत आहेत. रेल्वे, बस सेवा बंद असल्यामुळे या सर्वांचे प्रचंड हाल सुरु आहेत. हे सर्व कामगार रोजंदारीवर शहरात काम करतात, मात्र सर्वच काम बंद असल्यामुळे यांना उत्पन्न काहीच नाही. या सर्वांची महसुल खात्याने डीजीटल माध्यमातुन माहीती गोळा करुन त्यांना योग्य ती मदत करण्याची मागणी केली जात आहे.


शहरातून हे सर्व परप्रांतीय परत आपल्या गावी गेल्यास प्रशासनावरील ताण कमी होण्यास नक्कीच मदत होईल, असे शिवसेना नेते अजय भोसले यांनी आमच्या प्रतिनिधीस सांगीतले. पीसीपी न्युज /डीजे ११ ३०

Share This
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top