Pune Crime

वरिष्ठ पोलीस अधिका~यांना वाचवण्यासाठी पोलीस निरिक्षकाचा गेला बळी– राज्य पोलीसदलात प्रचंड खळबळ

शहरातील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरिक्षका वर गुन्हा दाखल करणे करीता राज्य सरकारकडे पाठवला अहवाल

वरिष्ठ पोलीस निरीक्षकानेच केला कायद्यातील तरतुदींचा भंग

LOGO OF Maharashtra Police

पुणे – देवेंद्र जैन : दरोडेखोराचे हात पाय फ्रॅक्चर केल्या प्रकरणात राज्य गुन्हे अण्वेषण विभागाच्या तपासात निष्पन्न झालेल्या काही अतिवरिष्ठ पोलीस अधिका~यांच्या बरोबर कनिष्ठांवर, विटा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा ०१/२००४ च्या तपासाला आता वेगळे वळण लागल्याचे दिसुन येत आहे. विटा, जिल्हा सांगली, येथे कार्यरत असताना तत्कालीन निवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामचंद्र घुगे यांनी दरोडेखोरांची टोळी उघडकीस आणली होती. यातील प्रमुख आरोपी विजय पाटील याला जबर मारहाण करुन हात पाय फ्रॅक्चर केल्याबाबतची तक्रार पाटील याची पत्नी अनिता हीने तत्कालीन उप मुख्यमंत्री यांचेकडे केली होती. त्यानुसार सरकारने राज्य गुन्हे अण्वेषण विभागाला चौकशी करण्याचे आदेश केले होते.

पोलीस निरिक्षक साळुंके यांना केलेल्या चौकशी मध्ये, रामचंद्र घुगे, दत्तात्रय मंडलीक, विश्वास पांढरे, सुरेश पवार यांचे समवेत अणखिण पाच अधिका~यांचे विरोधात पुरावा मीळुन आल्याचे म्हटले आहे. मात्र साळुंके यांनी गुन्हा दाखल करताना फक्त घुगे व त्यांना सहाय्य करणारे अधिकारी व कर्मचारी असा मोघम उल्लेख केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलीस उप अधिक्षक ए डी ईंगळे यांनी केलेल्या तपासात घुगे यांचे व्यतिरिक्त १४ वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांचे विरुद्ध आरोपी म्हणुन पुरावे मीळुन आल्याचे म्हटले आहे. या नंतर परत तत्कालीन पोलीस उप अधिक्षक एस डी लंघे यांनी केलेल्या तपासात घुगे यांचे व्यतिरिक्त दत्तात्रय मंडलीक, विश्वास पांढरे, सुरेश पवार व ईत्तर ७ आरोपीं विरोधात पुरावे मीळुन आल्याचे म्हटले आहे. व तसा अहवाल अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अण्वेषण विभागा मार्फत १९ ऑगस्ट २००६ रोजी राज्याचे पोलीस महासंचालक यांना सादर करुन सदर तपासात घुगे, मंडलीक, पांढरे व ईत्तर ७ आरोपींना अटक करण्याची परवानगी मागीतली होती. ३० फेबु २००६ रोजी अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अण्वेषण विभाग यांनी प्राप्त अहवाला नुसार योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. असे असताना तपास अधिकारी लंघे यांनी २७ ऑक्टोबर २००५ रोजी फक्त घुगे यांचे विरोधात न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. याबाबत घुगे यांनी पाठपुरावा सुरु ठेवला तरी सुद्धा लंघे यांनी ईत्तर आरोपीं विरोधात भक्कम पुरावा असतानाही पुरवणी दोषारोपत्र सादर केले नाही.

यामुळे घुगे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात लंघे व ईत्तर अधिका~यांच्या विरोधात २ जानेवारी २०१९ रोजी तक्रार दाखल केली ज्यामध्ये लंघे यांनी केलेली कृती ही कायध्याचे उल्लंघन करणारी आहे, त्यांनी न्यायालयात सादर केलेले दोषारोपत्राचा दस्त भारतीय दंड संहीतेच्या कलम १६७ नुसार हेतुत: चुकीचा तयार करुन दाखल केला, जो अपराध आहे, असे नमुद करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरिक्षक एम एम मुजावर यांनी गुन्हा दाखल करणे बंधनकारक असताना तसे न करता सदर तक्रार अर्ज् राज्य गुन्हे अण्वेषण विभागाला ६ फेबु २०१९ रोजी पाठवला, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांचे सुद्धा मुजावर यांनी उल्लंघन केल्याचे प्राधिकरणाला स्पष्ट दिसुन आले.

तपास अधिकारी लंघे यांनी प्राधिकरण येथे जो जवाब दिला त्यामध्ये त्यांनी अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला, त्यात प्रामुख्याने, सदर गुन्ह्यात १४ ऑक्टोबर २००५ च्या पत्रानुसार, घुगे यांचे व्यतिरिक्त सर्व आठ आरोपींना अटक करुन न्यायालयात दोषारोपत्र सादर करावयची होती, मात्र राज्य गुन्हे अण्वेषण विभागातील त्यांच्या वरिष्ठांनी, फक्त घुगें विरोधात दोषारोपत्र पाठवण्याचा आदेश केला, परंतु सदर आदेशाबाबतची वाच्यता लंघे यांनी न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपत्रात नमुद केली नाही,

प्राधिकरणाचे अध्यक्ष पां. रमेश जोशी, सदस्स, सी जी कुंभार व पोलीस उप आयुक्त विरेंद्र मिश्र यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरिक्षक एम एम मुजावर यांचे विरोधात कलम १६७ खाली घुगे यांची तक्रार दखलपात्र असता गुन्हा दाखल न करण्याची कसुरी केली असल्याचे आपल्या अहवालात नमुद केले व सदर अहवालावर योग्य ती कार्यवाही करणे करीता गृह विभागाचे अवर मुख्य सचिव व पोलीस आयुक्त यांना पाठवला असल्याचे कळवण्यात आले आहे.

सद्यस्थीती या गुन्ह्यातील अनेक अधिकारी अति वरिष्ठ पदांवर आरुढ आहेत व घुगे यांचे सहीत अनेक निवृत्त झाले आहेत. प्राधिकरणा समोर सर्व घटनेचा उलगडा झाल्यामुळे राज्य पोलीसदलात खळबळ उडाल्याचे सुत्रांनी सांगीतले आहे.

Share This
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top