पुणे १३ एप्रिल २०२० पीसीपी वृत्तसंस्था प्रतिनिधी : सध्या देशात करोना विषाणु ने धुमाकुळ घातलेला असताना, शेतक~यांवर करोना बरोबर आस्मानी संकट कोसळलेले आहे. या वर सरकारने वेळीच उपाय जर शोधला नाही तर पुढील काही दिवसात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती अनेक जाणकारांनी व्यक्त केली आहे.
प्रशासन, पणन मंडळ, महसुल खाते, दलाल, आडते, कृषी उत्पन्न बाजार समीती व कायदा सुव्यवस्था राखणारे पोलीस, या सर्वांमध्ये कोणताही समन्वय नसल्यामुळे शेतकरी भीकेला लागत आहे. शेतक~याचे पीक कवडीमोल भावाने विकले जात आहे. असे असतानाही सामान्य नागरीकांना जिवनावश्यक वस्तुंबरोबर फळ भाज्यांकरीता मोठी किम्मत मोजावी लागत आहे.
अत्यावश्यक सेवेत सर्व जिवनावश्यक वस्तु मोडत असताना मध्यमवर्गीय नागरीकांना सर्वच वस्तु चढ्या दामाने खरेदी कराव्या लागत आहे. सर्व ठीकाणी काळाबाजार सुरु आहे. प्रशासनातील काही आडमुठ्या अधिका~यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी व सर्वसामान्यांची अक्षरश: परवड सुरु आहे. शेतक~याच्या फळ भाज्या बाजारात नेण्याकरीता वहातुकीची कोणतीही योग्य सुवीधा प्रशासन पुरवु शकत नाही, जिल्ह्यातील सर्वच ठीकाणी पोलीसांच्या दंडुक्याला घाबरुन वहातुक बंद आहे, काही ठीकाणचे रस्ते बंद केले आहेत त्यामुळे ट्रक व टेंपो चालक कोणीही भाज्या भरण्यास तयार नाही. यामुळे अनेक शेतक~यांनी भाज्या एकतर फेकुन दिल्या आहेत अथवा रोटर फिरवला आहे. जे शेतकरी शहरापर्यंत माल घेउन येतात त्यांच्या मालाला एकतर भाव मीळत नाही, अन्यथा लाखाच्या मालाचे काही हजार रुपये पदरात पडत आहे. हाच माल शहरातील नागरीक चढ्या दराने खरेदी करत आहे.
पीसीपी न्युज वृत्तसंस्थेकडे अनेक शेतक~यांनी त्यांचेवर झालेल्या अन्याया बाबत कळवले आहे. शेतक~यां वर होत असलेल्या अन्यायाबाबत कोणताही राजकीय पक्ष पुढे आलेला नाही. पुढील काही दिवसात या समस्येवर सरकारने उपाय न काढल्यास अनेक शेतक~यांना आत्महत्या करण्याची अथवा खाजगी सावकरांकडुन कर्ज घेण्याची वेळ ओढावेल.
करोना नावाच्या विषाणु बरोबर सर्वच लढत असताना, प्रशासनाने सर्व यंत्रणा बरोबर समन्वय साधुन मार्ग काढणे सोयीचे ठरेल, अन्यथा राज्यातील करोना मुळे मृत्यु आलेल्या पेक्षा शेतक~यांवर आत्महत्या करण्याची पाळी ओढावणार नाही या कडे लक्ष घालने उचित ठरेल. पीसीपी/डीजे/१४ ३०
