येरवडा मध्यवर्ती कारागृहात रात्री भोजन करताना अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद, पोलीस उप महानिरीक्षक योगेश देसाई व अधिक्षक यु टी पवार
पीसीपी पुणे प्रतिनिधी १९ एप्रिल २०२० : देशाच्या ईतिहासात प्रथमच राज्यातील ५ महत्वाची कारागृह थेट “कुलुपबंद” केल्यामुळे तेथे कर्तव्य बजावणारे कर्मचारी व अधिका~यांचे मनोबल वाढण्याच्या उद्देशाने राज्य पोलीसदलातील काही अति वरिष्ठ अधिका~यांनी कालची रात्र कारागृहात काढली.
करोना विषाणु चा संसर्ग वाढु नये या करीता देशात लाॅकडाउन सुरु असल्यामुळे सर्व काही ठप्प झाले आहे. महत्वाच्या ५ कारागृहात सुद्धा लाॅकडाउन सुरु केल्यामुळे या मध्ये कोणताही नवा बंदी स्विकारला जात नाही व जे कर्तव्यावर होते ते सर्व आतच आपले कर्तव्य बजावत आहे. सर्वसामान्य नागरिकांना लाॅकडाउन मध्ये जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याकरीता सरकारने काही सुट दिली आहे पण येथील परिस्थीती थोडी वेगळी आहे. मानसोपचार तज्ञांच्या मते, बंदी असेही लाॅकडाउन मध्येच असतात पण कर्मचारी व अधिका~यांच्या मनावर याचे परिणाम उमटु नये या करीता या अधिका~यांनी हा प्रयोग सुरु केला आहे.
राज्य सुधारसेवा विभाग (कारागृह) चे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद, पोलीस उप- महानिरिक्षक योगेश देसाई यांनी काल अचानक येरवडा मध्यवर्ती कारागृहात मुक्काम ठोकला. राज्यातील ५ महत्वाची कारागृह ही रामानंद यांनी पुर्णपणे कुलुपबंद केली आहे. त्यामुळे जे अधिकारी व कर्मचारी कारागृहात कर्तव्य बजावत आहे ते गेले अनेक दिवस बाहेर आलेले नाही, त्यामुळे त्यांचे मनोबल वाढवणे आवश्यक होते, त्यामुळे कारागृहाच्या ईतिहासात प्रथमच अप्पर पोलीस महासंचालक व ईत्तर अधिका~यांनी तेथेच मुक्काम ठोकण्याचा निर्णय घेतला. हा प्रयोग पुर्णपणे यशस्वी झाला व ईत्तर कारागृहात करणार आहे, त्यामुळे ईत्तरांना प्रेरणा मिळेल असे रामानंद यांनी पीसीपी वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधी बरोबर बोलताना सांगितले
रामानंद यांनी त्यांना मीळालेल्या प्रत्येक ठीकाणच्या सेवाकाळात अनेक महत्वाचे प्रयोग केले आहेत व त्याचे समाजावर दुरगामी परिणाम झाल्याचे दिसुव आले आहे. राज्य राखीव पोलीसदलात महानिरिक्षक असताना त्यांनी देशात प्रथमच पोलीसांचा “पाईप बॅंड” उभारला,थोड्याच अवधित या बॅंड ची किर्ती सुंपुर्ण देशातील पोलीसदलात पसरली व गेली अनेक वर्ष हा बॅंड पोलीसांच्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक मीळवत आहे,. पुणे शहराचे ते सह आयुक्त असताना त्यांनी गणेशोत्सवा मध्ये दोन महत्वाच्या गणपती मंडळांची संयुक्त विसर्जन मीरवणुक सुरु केली, जी आज ही कायम आहे. मकोका कायद्याचा सर्वात जास्त वापर करुन शहरातील गुन्हेगाराचे अक्षर्शा कंबरडे मोडले, ज्या गुन्हेगारांवर ही कारवाई केली त्यातील जवळपास सर्वच गुण्हेगार राज्यातील अनेक कारागृहात आज ही खितपत पडले आहे. राज्य गुन्हे अण्वेषण विभागात ते विशेष पोलीस महानिरिक्षक असताना तेथे त्यांनी अनेक नामांकीतांवर मकोका दाखल करुन कडक कारवाई केली. अहमदनगर येथे शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांचा खुन झाल्यानंतर तेथील मातब्बर राजकीय नेत्यांना गजाआड केले व त्याची परिणीती म्हणुन तत्कालीन सरकारने त्यांना राज्य सुरक्षा दलाचे प्रमुख म्हणुन बदली करण्यात आली. त्यानंतर त्यांना कारागृह विभागाचे प्रमुख म्हणुन नेमण्यात आले. येथेही त्यांनी अनेक धाडसी लोकाभीमुख निर्णय घेण्याचा धडाका सुरु ठेवला. पुणेकरांच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा व जिव्हाळ्याचा सण म्हणजे गणेशोत्सव, याकरीता त्यांनी थेट पुणेकरांच्या ह्रुदयात हात घातला व राज्यात प्रथमच कैद्यांचे ढोलपथक सुरु केले, २०१९ च्या गणेशोत्सवात या पथकाची किर्ती जगभर पसरली व काल त्यांनी थेट कारागृहात मुक्काम ठोकला. त्यांचे समवेत योगेश देसाई, कारागृह अधिक्षक यु टी पवार हे सुद्धा होते. पीसीपी/डीजे/११ ४०
