Pune Crime

पी एम पी एल च्या राम रहीम ने वाचवले गर्भवती महीलेचे प्राण

IMG-20200410-WA0017

पुणे प्रतिनिधी : करोना विषाणु च्या संसर्ग मुळे सर्व देश संकटात असताना, काही “अत्यावश्यक सेवेतील”” राम रहीम देवाच्या रुपाने नागरिकांना मदत करत असल्याचे आढळुन येत आहे.

शहरात अश्याच एका घटनेमध्ये एका गर्भवती महीलेचे प्राण एका दक्ष पी एम पी एल चालक व वाहकाने वाचवले आहेत. आज दि.१०/०४/२०२० रोजी सिहगड रस्ता येथील माणिक बाग परिसरात एक गर्भवती महिला भर उन्हात दुपारी १२:३० वा.चक्कर येऊन पडली. त्याच वेली तेतुन नांदेड सिटी ते डेक्कन मार्गावर अत्यावश्यक सेवेतील पी.एम.पी एल बस काही.प्रवासी घेऊन जात असताना बस चालक फिरोज हमीद खान व कंडक्टर श्री.विजय रामचंद्र मोरे यांनी बस तेथेच थांबवली व सदर महीलेला बस मध्ये झोपवुन, प्रवाशांना खाली उतरवून, बस त्वरीत कमला नेहरु रुग्णालय येथे आणले व लगोलग डाॅक्टरांना विनंती करुन महीलेवर उपचार करण्यास सांगीतले.
आपल्या नोकरीची पर्वा न करता कोणतेही वरिष्ठ आदेश न घेता या दोघांनी केलेल्या धाडसाचे सर्व ठीकाणी कौतुक होत आहे. ही बाब कळताच पी एम पी एल चे संचालक व नगरसेवक शंकर पवार यांनी या दोघांना बक्षीस जाहीर केले. आजच्या परिस्थितीत राम रहीम यांचे एकत्रित दर्शन पहावयास मिळाले, असे शंकर पवार म्हणाले. पीसीपी /डीजे/०३ १५

Share This
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top