सुनील रामानंद, अप्पर पोलीस महासंचालक, राज्य कारागृह विभाग.
पहील्या दिवसांपासुन सर्व कारागृहात सामाजीक अंतर (सोशल डीस्टसिंग) ची अंमलबजावणी
पीसीपी न्यूज पुणे प्रतिनिधी ०९ एप्रिल २०२० : करोनाचे संकट ज्याप्रकारे वाढत आहे, ते पाहुन राज्यातील पाच महत्वाच्या कारागृहात आज पासुन पुर्णपणे लाॅकडाउन ची घोषना, राज्य कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी आज केली.
लाॅकडाउन करण्यात येणारे कारागृह येरवडा, ठाणे, कल्याण, अर्थर रोड, भायकल्ला, मध्ये आजपासुन कोणताही नवीन कैदी समाविष्ट करण्यात येणार नाही. कोवीड १९ च्या विरोधात लढा देण्यासाठी कारागृह विभागाने सर्वात प्रथम महत्वाच्या उपाय योजना सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहण केल्यानंतर सर्व कारागृहात सामाजीक अंतर (सोशल डीस्टसिंग) ची अंमलबजावणी पहील्या दिवसांपासुन करण्यात आलेली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्दोषानुसार ७ वर्षा खालील शिक्षा अपेक्षीत असणा~या अनेकांना संबंधीत न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करुन काही काळासाठी जामीनावर मुक्त करम्यात येत असल्याचे, रामानंद यांनी सांगीतले.
करोना विषाणु चा संसर्ग रोखण्याकरीता राज्यातील सर्व कारागृहात प्रबोधन केले जात आहे तसेच एक चित्रफीत सुद्धा दाखवण्यात येत आहे. यामुळे बंद्यांमध्ये मोठी जागरुता निर्माण होउन, बंद्यांचे आरोग्य व्यवस्थीत ठेवण्याकरीता येथील डाॅक्टर व सर्व कर्मचारी प्रयत्न करत असल्याचे रामानंद यांनी सांगीतले.
देशातील वाढत असलेला करोना संसर्ग पाहुन, आज पासुन काही महत्वाच्या कारागृहात पुर्ण लाॅकडाउन करण्यात येत आहे, कारण नवीन येणा~या कैद्यास जर याची लागन झाली असल्यास आत मध्ये असलेल्या बंद्यांना धोका निर्माण होउ शकतो, म्हणुन लाॅकडाउन चा निर्णय घेण्यात आला आहे. रामानंद यांच्या नुसार या कारागृहात आजपासुन कोणताही नवीन बंदी घेतला जाणार नाही, पोलीसांनी नजीकच्या कारागृहात बंद्यांना पाठवयाचे आहे. PCP/DJ/0930
