Pune Crime

राष्ट्रीय आपत्ती निवारणदलाचे (NDRF) तत्कालीन प्रमुख आलोक अवस्थी यांचा जपान टाईम्स या प्रमुख वृत्तपत्राने घेतली दखल- आपातकालीन परिस्थीतीला कसे सामोरे जावे, या करीता मांडल्या १० सुचना= माळीण दुर्घटनेतील मदतकार्याचे ठरले होते चे ‘हीरो’ – देशातील लोकांनी या सूचनांचा अंमल करून करोना ला लावावे पळवून– आलोक अवस्थी

NDRF LOGO

Screenshot_20200405-150936__01

पीसीपी न्यूज पुणे ०५ एप्रिल २०२० (देवेंद्र जैन) : पुणे देवेंद्र जैन : राष्ट्रीय आपत्ती निवारणदलाचे तत्कालीन प्रमुख आलोक अवस्थी यांनी जगभरात कोठेही आपातकालीन परिस्थीती ओढावल्यानंतर घ्यावयाची काळजी, बाबत मांडलेल्या १० महत्वपूर्ण सुचनांचे जपान मधील प्रमुख दैनिक जपान टाईम्स ने दखल घेउन आपल्या देशाच्या शिरपेचात अणखिन एक तुरा रोवला आहे. तसेच या सूचनांची नागरिकांनी अंमलबजावणी केल्यास “करोना” सारख्या विषाणूला सुद्धा आपण नक्कीच पळवून लावू,असा आत्मविश्वास अवस्थी यांनी पीसीपी न्यूज प्रतिनिधी बरोबर फोन द्वारे बोलताना व्यक्त केला.

३० जुलै २०१४ रोजी एक महाकाय दरड आंबेगाव तालुक्यातील माळीण या गावावर पडली व संपुर्ण देश हादरला होता. या दुर्घटने मध्ये जवळपास १५१ नागरिकांचा मृत्यु झाला व या दुर्घटने आठवणी आजही अंगावर शहारे आणतात. दरड कोसळल्यानंतर सर्वात प्रथम राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) च्या अनेक तुकड्या डेपु.कमांडनट गावडे यांचे सह तेथे पोचल्या व मदतकार्य सुरु केले व पुढील ६ दिवसात हे काम पुर्ण केले. या सर्व तुकड्यांचे तत्कालीन प्रमुख आलोक अवस्थी यांना भारत सरकारने “माळीण’ येथील उतक्रुस्ट कामगिरी बद्दल विशेष पदक देउन संमानीत केले.

अवस्थी यांनी या आधी मार्च २०११ मध्ये पुर्व जपानच्या तोहोकु प्रांतातील ओनागावा या शहरावर आलेल्या २० मीटर उंचीच्या सुनामी लाटेत, शहर बेचीराख झालेले असताना, २८ मार्च २०११ रोजी ४६ सदस्यांचे पहिले परदेशी मदत दल पथक घेउन मदतकार्य सुरु केले. जपानचे तत्कालीन राजदुत यांनी देशाच्या पंतप्रधानांना विनंती करुन (NDRF) चे पथक ओनागावा येथे पाठवण्यास सांगीतले, लगेचच भारतातुन अवस्थी यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक पाठवण्यात आले. सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या या शहरातील ८०० नागरिकांचा मृत्यु झाला होता व अशा परिस्थीती मध्ये NDRF च्या सदस्यांनी ज्या पद्धतीने मदतकार्य केले ते आजही मनात कोरले गेले आहे तसेच या शहरातील नागरीकांनी केलेले आदरतीथ्य आमचे पथक कधीही विसरु शकणार नाही असे, अवस्थी यांनी पुढारी प्रतिनिधी बरोबर दुरध्वणीरुन बोलताना सांगीतले.

जपान येथुन परतल्यानंतर अवस्थी यांनी नैसर्गीक आपत्तीचा सामना करणे करीता आवश्यक असे १० धडे लीहुन काढले होते व याबाबत त्यांनी देशात अनेक शहरात त्यावर प्रबोधन केले. अवस्थी यांच्या या १० धड्यांची उत्सुकता जपान सरकारला होती म्हणुन त्यांच्या राजदुतांनी त्वरीत त्यांना जपान भेटीचे आमंत्रण दिले आहे व ते पोचण्याआधीच त्यांचे १० धड्यांबाबत जपानमध्ये उत्सुकता लागली आहे व त्याकरीता जपान टाईम्स या वृत्तपत्रात त्यांची मुलाखत छापुन आली आहे.

ज्या ओनागावा शहराला सुनामीचा फटका बसला होता, ते पुर्ण बेचिराख झाले होते व आज त्या शहरातील अनेक छायाचित्र पाहुन त्यांना आजच्या परिस्थीतीवर विश्वासच बसेना. फक्त ९ वर्षात ओनागावा हे पुर्ण होते त्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीने उभे राहीले आहे व याचे थोडे श्रेय तेथील सरकार भारताच्या NDRF पथकाला देत आहे.

याबाबत अधिक बोलताना अवस्थी म्हणाले की, जपान येथे केलेले काम मला माळीण येथे उपयोगी पडले म्हणुनच माळीण येथील मदतकार्य अवघ्या एका सप्ताहांत संपले. जपान येथे जे १० धडे मी शिकलो त्याचा प्रसार होणे खुपच गरजेचा आहे कारण कोणतीही नैसर्गीक आपत्ती ही सांगुन येत नाही व त्यायाठी सर्वांनीच हे १० धडे वाचणे आवश्यक आहे, सद्यस्थितीत आपल्या देशावर व संपूर्ण जगात कोरोन चे संकट उभे ठाकले आहे, याचा सामना करण्याकरिता या दहा धड्यांचे अनुकरण केल्यास आपण नक्कीच करोना वर मात करू शकतो असे अवस्थी म्हणाले.

NDRF Abroad Operations

जपान मध्ये घेतलेेले धडे
येथील नागरिकांना सरकार वेळोवेळी आपत्तीला सामोरे जाण्याचे प्रशिक्षण देत असते, यात ज्येष्ठ नागरीकांना सुद्धा सामील केले जाते.
येथील प्रसारमाध्यांनमे बातम्या प्रसारीत करताना खुप काळजी घेतात, अफवांवर येथील नागरीक विश्वास ठेवत नाही, प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्यामुळे कोणतीही चुकीची बातमी दिली जात नाही.
आपत्तीच्या काळात जर विद्युत पुरवठा खंडीत झाला तर येथील नागरिक दुकानातील वस्तु आहे तीथेच ठेउन बाहेर पडतात.
नैसर्गिक आपत्ती कोसळल्यानंतर कोणतेही उपहारगृह, पेट्रोल पंपचालक दर वाढवुन पैसे कमवत नाही, या उलट दर कमी केले जातात व आर्थीकदृष्ट्या कमजोर नागरिकांची अधिक काळजी घेतली जाते.
शानताता राखुन सहकार्य करत असतात
आपत्ती कोसळल्यानंतर कोणीही उर बडवुन रडत अथवा कांगावा करत नाही.
जिवनाश्यक वस्तु व पाण्यासाठी रांगा लावुन सर्वांना पुरेल एवढ्या वस्तु घेतल्या जातात, कोणीही याचे उल्लंघन करत नाही.
संपुर्णपणे शिस्तिचे पालन केले जाते.
आपत्तीग्रस्त आवश्यक असेल तेवढेच किराना खरेदी करतात. सर्वांना साठा पुरेल याची काळजी घेतली जाते.
कुठेही लुटमार, गडबड गोंधळ, अथवी आरडोओरड होत नाही.
वहातुक नियमांचे पालन केले जाते.
कहर म्हणजे जवळपास पन्नास कर्मचारी अणुशक्ती केंद्रातील पाणी बाहेर काढणेसाठी तीथेच थांबतात.

सद्यस्थीतीत अवस्थी जलद कृती दलात (Rapid Action Force ) पोलीस उप महानिरिक्षक या पदावर दिल्ली येथे कार्यरत आहेत. ओनागावा येथील आपत्तीच्या स्मर्णार्थ आजही त्यांच्या सरकारी गणवेशावर जपान व भारताच्या झेंड्याचे चिन्ह पीन स्वरुपात ते लावतात. PCP/DJ/१० ३०

Share This
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top