पुणे पीसीपी वृत्तसंस्था २८ एप्रिल २०२० : सोसल डीस्टंसिंग चे भान ऱाखुन शहर पोलीसदलाच्या गुन्हे शाखेतील पथक १ ने टाकलेल्या छाप्यात लाखो रुपयांचे तंबाखुजन्य पदार्थ जप्त करण्यात आले.
सद्यस्थीतीत पोलीसदल हे पुर्णपणे लाॅकडाउन च्या बंदोबस्तात अडकलेले असताना, हा छापा टाकताना “सामाजीक अंतर” ठेवुन यशय्वी कार्यवाही केली. गुन्हे शाखा युनीट -१ चे पोलीस नाीक सचिन जाधव यांना मिळालेल्या बातमी वरुन पोलीस उप निरीक्षक उत्तम बुदगुडे,पो ना वाघवले,पो ना पो.काॅ गजानन सोनवणे यांनी महालक्ष्मी काॅम्लेक्स शिवणे पुणे येथे केलेल्या कारवाईत ४ आरोपींना अटक करुन, त्यांचेकडुन मारुती ईको च्या ३ चारचाकी वहानासह,सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ असा सर्व मिळून कीं रू १४,४१,००२ रु चा माल जप्त केला.
अटक करण्यात आलेले चारही आरोपी बंदी असलेला गुटखा विकत होते, आरोपीं व त्यांना माल पुरविणारा चौथा अरोपी नामे (१) रोहीत सिताराम प्रजापती वय २३ रा.महाल्क्षमी काॅम्लेक्स शिवणे गांव पुणे (२) विजय सिताराम प्रजापती वय २५ (३) पंकज शिवनारायण प्रजापती वय २२ रा.सदर (४) मुकेश पारसमल छाजेड वय(४०) रा. ८८० वीर लहूजी सोसा.सहकारनगर पुणे यांना ताब्यात घेऊन चारचाकी वहानासह ,सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ असा सर्व मिळून कीं रू १४,४१,००२ रु चा माल जप्त केलेला आहे.
पोलीसांनी वरील आरोपींना, सिगारेट,तंबाखू व तीन्ही कारसह पुढिल कारवाई करीता उत्तमनगर पोलीस ठाणेचे ताब्यात दिले. सदर कारवाई गुन्हे शाखेचे अति पोलीस आयुक्त अशोक मोराले, पोलीस उपायुक्त बचनसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल डीस्टंसिंग चे भान ठेउन, पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरुन वायकर व ईत्तरांनी केली. पीसीपी/डीजे/२३ ४०
