पुणे प्रतिनिधी : करोनाच्या लढाईत सर्वात आघाडीवर असलेले पोलीसदल, सद्यस्थीतीत अनेक प्रार्थमिक सुवीधांपासुन वंचित असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
लाॅकडाउन च्या पहील्या दिवसांपासुन पोलीसांवर मोठा ताण पडला आहे. जनते बरोबर जास्ती जास्त संपर्क पोलीसांचा होत असल्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. मोकाट फिरत असलेल्या अनेक नागरिकांना धडा शिकवण्याच्या धांदलीत, पोलीसांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे व यातुनच करोना विषाणु चा संसर्ग वाढण्याची भीती अनेक डाॅक्टरांनी वर्तवली आहे. अनेक ठीकाणी लाठ्यांचा मोठा वापर करण्यात येत आहे मात्र लाठ्यांचे निर्जंतुकीकरण न करता त्या परत परत वापरल्या जात आहे. यातुन प्रसिद्धी मीळवण्याचा मोह पोलीस व अधिका~यांना आवरणे गरजेचे आहे. शास्त्रीय व रासायनिक बाबींचा अभ्यास अथवा आवश्यक आधारांचा अभ्यास न करता अनेक ठीकाणी सॅनिटायजेशन कक्ष उभारण्यात आले आहेत जेथे आता फक्त सॅनिटायजर चे प्रमाण कमी व पाणीच जास्त वापरले जात आहे.
शहरात कर्तव्य बजावत असलेल्या पोलीसां बरोबर महीला पोलीसांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरु आहे, सर्वात मोठी समस्या शौचालयाची आहे, अनेक ठीकाणी फुटपाथ वर दिवसभर बसावे लागत आहे, तसेच पीण्याकरीता यांना पाणी सुद्धा उपलब्ध होत नाही.
शहराच्या मध्यवस्तितील एका पोलीस ठाण्यातील कर्माचायाला करोनाची लागण झाल्यानंतर सुद्धा अति वरिष्ठ अधिकायांना जाग आलेली दिसत नाही. संसर्ग झाल्यानंतर या पोलीसाला दाखल करण्याकरीता सुमारे अडीच तास रुग्णवाहीका मीळाली नाही, नंतर याला अनेक ईस्पितळांनी प्रवेश नाकारला. ही बाब वरिष्ठ अधिकायां कळाल्यानंतर एका खाजगी ईस्पितळात दाखल केले गेले. ज्या पोलीस ठाण्यात हा कर्मचारी कर्तव्य बजावत होता तेथील ईमारतीमधील वरिष्ठांचा आता राबता कमी झाल्याचे अनेकांनी सांगीतले. आम्ही माणसे नाही का? असा उलट प्रश्न अनेक पुरुष व महीला पोलीस कर्माचायांनी नाव न सांगता आमच्या वृत्तसंस्थे कडे व्यक्त केला व आपली नाराजी सुद्धा. मात्र अधिकायां बाबत कोणतेही भाष्य यांनी केले नाही. नुकतेच मुंबई पोलीसदलातील तीन कर्मचायांचा करोना लागण झाल्या मुळे मृत्यु झाला. एवढी गंभीर घटना घडुनही गृह खात्याला अजुन जाग आलेली दिसत नाही. पोलीसांच्या आरोग्याचा प्रश्न हा संपुर्ण राज्यचा आहे.
सद्यस्थीतीत राज्य सरकारचे मुंबई पोलीसदलावर जास्त लक्ष आहे, तेथील पोलीसांना अनेक प्रार्थमिक सुवीधा पुरवण्याकरीता प्राधान्य दिले जात आहे. जवळपास ५ हजार सुरक्षा कीट, फेस मास्क,हात मोजे, विशेष मास्क व सॅनिटायजर चा मोठा पुरवठा करण्यात आला आहे.
खाजगी दवाखाने बंदचा फटका पोलीस परिवारांना.
लाॅकडाउन मुळे सर्वच व्यवहार ठप्प झालेले असताना, शहरातील सर्वच प्रकारचे औषध उपचार करणारे दवाखाने बंद आहेत, त्याचा फटका सर्वसामान्यां प्रमाणे पोलीस परिवारांनाही बसत आहे. पोलीस वसाहतीं मध्ये असलेल्या वैद्यकिय तपासणी केंद्रात या कठीण परिस्थीती मध्ये कोणत्यीही आधुनीक सुवीधा अध्याप सुरु झालेल्या नाहीत. शिवाजीनगर, स्वारगेट येथील वसाहती मधील ईस्पितळे ही फक्त नावापुरती आहेत, त्याचा पोलीस परिवारांना काहीच फायदा होत नसल्याचा आरोप अनेक परिवारातील सदस्यांनी केला आहे. तसेच शहरात अनेक ठीकाणी डाॅक्टरांकडुन अडवणुक केली जात आहे व जास्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी अनेक पोलीसांनी आमच्या निर्दशणास आणल्या आहेत.
करोनाच्या संकटात जर पोलीसांच्या आरोग्याकडे वेळेत लक्ष न दिल्यास याचे परिणाम नुसत्या पोलीसदलावरच न होता समाजावर सुद्धा होउ शकतात, या प्रश्नाकडे गांभीर्याने बघणे जरुरीचे आहे, तसेच प्रसिद्धी कमी करुन कर्मचारी व त्यांच्या परिवाराकडे लक्ष देण्याची मागणी शिवसेना नेते अजय भोसले यांनी केली.पीसीपी/डीजे/ ०३ ४५
