Pune Crime

Screenshot_20200430-101500

मार्केट यार्ड जवळ भीषण आग–

लाखो रुपयांचे नुकसान–

अग्निशामकदलाची मोठी कामगीरी–

पीसीपी वृत्तसंस्था पुणे प्रतिनिधी : शहरात लाॅकडाउन सुरु असताना, अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत, याचा फटका रात्री अग्निशामकदलाला सुद्धा बसला, या कठीण प्रसंगाचे भान राखुन जवानांनी मोठे प्रयत्न करुन भीषण भडकलेल्या आगीवर नियंत्रण मीलवले.

शहराच्या मार्केट यार्ड परिसरातील रहिवासी संस्थे मध्ये एका व्यापा~याच्या रद्दी साठ्याला रात्री आग लागली, या व्यापा~याने सुरक्षा नियमांचा कोणतेही पालन न करता ईमारतीच्या ३ मजल्यात संपुर्ण कागदाची रद्दी भरुन ठेवली होती व तीथेच एका ट्रक मध्ये पुठ्यांचा साठा ठेवण्यात आला होता, जवळपास ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे या व्यापा~याने आग नियंत्रण अधिकारी प्रमोद सोनावणे यांना सांगीतले असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधी बरोबर बोलताना सांगीतले. . रात्री ११ ३० च्या नंतर रद्दीने पेट घेतला, या तीन मजली ईमारतीत फक्त कागद असल्यामुळे आगीने थोड्याच वेळात रौद्र रुप धारन केले. मला कळाल्यानंतर मी घटनास्थळी रवाना झालो व आगीची भीषणता पाहुन ईत्तर ठीकाणावरुन बंब मागवले, ६ बंबानी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन, कोणतीही जिवित हानी न होता, आग न पसरता, सुमारे तासात आगीवर नियंत्रण मीळवले, असे अग्निशामकदलाचे प्रमुख प्रशांत रणपीसे यांनी सांगीतले.

रस्ते बंद असल्यामुळे अनेक ठीकाणी समस्या निर्माण झाल्या मात्र यात वेळ न दवडता आम्ही ईत्तर मार्गाने घटनास्थळी पोचलो, असे एका चालकाने सांगीतले. रहीवासी ईमारती मद्ये रद्दी सारख्या वस्तुं व आग लगेच पकडणा~या वस्तुंचा साठा नागरीकांनी करु नये, असे आवाहण रनपीसे यांनी केले.


या बाबत संबंधीत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक, सहायक पोलीस आयुक्त यांना माहीती विचारली असता त्यांतेकडुन कोणताही प्रतिसाद मीळाला नाही. पीसीपी/डीजे/०७ ४०

Share This
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top