Pune Crime

SELLING SANITIZER WITHOUT LICENSE WILL BE CRIME ; S. B. PATIL JT COMM. FDA

परवाना नसताना सॅनिटायजर विकल्यास कारवाई होणार — एस बी पाटील सह आयुक्त अन्न औषध प्रशासन

सॅनिटायजर विकणा-यांचे फुटले पेव

पक्या बीलाद्वारे खरेदी करावी

पीसीपी वृत्तसंस्था पुणे देवेंद्र जैन : करोनाचे संकट जेव्हापासुन सुरु झाले त्यावेळे पासुन करोनाच्या नावावर अनेक बेकायदेशिर उद्योगांचे पेव फुटले आहे. सॅनिटायजर विकणारे तर पावसाळ्यातील छत्र्यां प्रमाणे उगवत आहे व याचा सर्वात मोठा फटका सर्वसामन्य नागरिकांना बसत आहे कारण त्यांचीच फसवणुक सुरु आहे.

याबाबत पीसीपी वृत्तसंस्थेच्या प्रतीनिधी बरोबर अन्न औषध प्रशासनाचे पुणे विभागाचे सहआयुक्त एस बी पाटील म्हणाले की, सॅनिटायजर विकणे करीता आमच्या विभागाचा परवाना आवश्यक आहे, कारण ते अन्न औषध मध्ये मोडते व सद्य:स्थीतीत अनेक वस्तु ज्या घाउक अथवा किरकोळ स्वरुपात विक्री करण्यास परवाना आवश्यक आहे, मात्र या कडे दुर्लक्ष करुन अनेकांनी मोठ्या प्रमाणावर या वस्तु बेकायदेशिरपणे व ग्राहकांना कोणतेही पक्के बील न देता विकण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी यापुढे सॅनिटायजर खरेदी करताना पक्के बिल घ्यावे.

पाटील पुढे म्हणतात की, सॅनिटायजर हे कायद्यातील कलम ३(ब) नुसार हे औषध या प्रवर्गात मोडत असल्याने सॅनिटायजर ची खरेदी ही मान्यताप्राप्त परवानाधारकाकडुन “”पक्या”” बीलाद्वारे करावी, नियम ६५(५) अन्वये याची विक्री ही किरकोळ औषध विक्रेते, अथवा परवानाधारक, फुटकळ औषधी परवानाधारक, शासकीय अथवा खाजगी रुग्णालय, यांनाच त्यांच्या मागणीनुसार करावी, तसेच सॅनिटायजर ची विक्री ही कोणत्याही परिस्थीतीत ईत्तर व्यावसाईक जे किराणा दुकान, जनरल स्टोअर्स अथवा ईत्तर व्यावसाईकांनी करु नये. जर अशा व्यावसाईकांनी याची विक्री केल्यास, कायद्यातील कलम १८(क) चे उल्लंघन होईल, त्यानुसार त्या व्यावसाईका विरोधात कायद्यातील तरतुगीनुसार कारवाई करण्यात येईल, त्यानुसार तो व्यावसाईक २ वर्ष शिक्षेस पात्र राहील, असा ईशारा पाटील यांनी दिला.

या बाबत या व्यवसायात नुकतीच सुरुवात केलेल्या शितल ब-हाटे म्हणाल्या की, सद्य:स्थीतीत या व्यवसायाचे कोणालाच गांभीर्य नाही, अनेकजण सॅनिटायजर व्यवसायाची कोणतीही कायदेशीर माहीती न घेताच, व्यवसाय करत आहेत, यातुन काही मोठा अपघात घडु शकतो कारण ही वस्तु ज्वलनग्रहीत आहे, मी स्वत: परवाना मीळणे करीता अर्ज दाखल केला आहे. अन्न औषध प्रशासनाकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे थोडा वेळ लागत आहे, म्हणुन नागरिकांनी थोडा संयम बाळगुन या व्यवसायात उतरावे. पीसीपी/डीजे/१२ ४५

Share This
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top