Pune Crime

5 Dead -Gas Tanker and Bus Accident


गॅस टॅकर व लक्झरी बस च्या समोरासमोर धडकेत दोन्ही वाहनांनी पेट घेतला.आगीत होरपळून पाच जणांचा मृत्यू झाला.

पीसीपी वृत्तसंस्था धुळे प्रतीनिधी : आज दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान सुरत नागपूर महामार्ग क्रं.6 वर गॅस टॅकर व लक्झरी बस चा समोरासमोर धडक होऊन भिपण अपघात झाला. गॅस टॅकर हा धुळ्याहुन जळगाव कडे जात होता तर लक्झरी बस जळगावहुन धुळ्याकडे येताना भिरडाणे फाट्या जवळ समोरासमोर धडक झाली.काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले.आगीत दोन्ही वाहने पुर्ण पणे जुळून राख झाली.फक्त सांगाडा शिल्लक राहिला.आगीत होरपळून पाच जणांचा मृत्यू झाला. अध्याप दोन्ही वाहनांचे क्रमांक अथवा मयतांचा योग्य आकडा कळु शकलेला नाही, मात्र पाच जणांचे सांगाडे मीळाल्यावरुन पोलीसांनी सद्यस्थीतीत पाच ठार, असे कळवले आहे.

आगीची माहिती मनपा अग्निशामक दलाला देण्यात आली.अपघात होताच मोठा आवाज झाला.यामुळे गावातील नागरीक महामार्गाकडे आवाजाच्या दिशेने धावले परंतू आगीचे रौद्र रूप पाहता नागरीक हतबल झाले.मनपा अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली.फायरमन अधिकारी तूषार ढाके, तुषार पाटील,श्याम कानडे, पांडुरंग पाटील, नरेंद्र बागुल यांनी आगीवर पाणी मारा करत आग आटोक्यात आणली.परंतू या आगीत लक्झरीतील चार जण व टॅकरचा चालक यांचा होरपळून मृत्यू झाला.

महामार्गावर दोन्ही बाजूला चार ते पाच किलोमीटर अंतरावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.तीन क्रेनच्या मदतीने वाहने बाजूला करण्याचे काम सुरू होते. महामार्गावरून गेलेली वीज वाहक तार, आगीच्या लोळामुळे तटल्याने तीस गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. वीज वाहक तार जोडण्याचे काम वीज वितरण कंपनीचे कर्मचारी युध्द पातळीवर करण्याचे प्रयत्नात व्यस्त होते.अंधार झाल्याने कार्यात अडथळा निर्माण होत होता.वाहतूक सुरळीत करण्यात महामार्ग पोलीसांची दमछाक झाली.

अपघात माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिकारी डॉक्टर राजू भुजबळ,उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे तालुका पोलीस ठाण्यातील पो.नि.दिलीप गांगुर्डे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 2016 मध्ये याच ठिकाणी प्रवासी वाहणा-या महिंद्रा पिकअप गाडी चा अपघात झाला होता, ज्यात 16 जण ठार झाले होते,त्याच ठीकाणी आज परत भिरढाणे फाट्यावर पाच जणांचा अग्नितांडवात होरपळून मृत्यू झाला.अंगावर काटा आणणारी घटना आहे.अध्याप मयतांची ओळख पटलेली नाही.

अपघातामुळे मुकटी कर ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहे.

महामार्गावरील ढाब्यावरील सिसीटिव्ही फुटेज तपासून दोन्ही वाहनांचे नंबर शोधण्याचे काम पोलीस करत आहे. तालुका पोलीस ठाण्यात अपघात बाबत रात्री उशिरा पर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. पीसीपी/डीडी/०८ ३०

Share This
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top