Pune Crime

CERTAIN PERSONNEL OF POLICE FORCE ARE GUILTY OF GROSS VIOLATION OF HUMAN RIGHTS – HIGH COURT

लाॅकडाउन मध्ये रस्त्यांवर फिरणा-यांंना पोलिसांनी शिक्षा देणे अमानवीय — उच्च न्यायालय

पुणे/नागपुर : देशात सुरु असलेल्या लाॅकडाउन मध्ये फिरना-यांना पोलीसांकडुन थेट शिक्षा देणे हे अमानवीय असल्याचे उच्च न्यायालयाचे न्यायाधिश रोहीत देव यांनी एका जनहीत याचीकेवर सुनावनी करताना पोलीसांवर ताषेरे ओढले व संबंधीत पोलीसांवर कारवाई करन्याचे आदेश देउन २१ मे रोजी पोलीस आयुक्तांनी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले.

न्यायाधिश देव यांनी आपल्या आदेशात अनेक घटनांचे बारकाईने निरिक्षण करताना म्हटले की, आपण एका कायद्य्याचे राज्य असलेल्या सुसंस्कृत समाजात राहतो. येथे व्यक्तींची प्रतीमा अतिशय महत्वाची आहे.अधिकारांचा गैरवापर सुरु असुन, नागरिकांना अशी अमानवी शिक्षा देउन, त्यांची प्रतीमा मलीन करणे हे चुकीचे असल्याचे, न्यायाधिश देव यांनी नमूद केले, तसेच संचारबंदी असताना रस्त्यावर विनाकारण फिरणा-या नागरिकांना रस्त्यावर उठाबशा काढायला लावणे, देशद्रोही असल्याचे फलक गळ्यात लावणे, भर उन्हात रस्त्यावर योगा करायला लावणे, त्याचे छायाचित्र अथवा चित्रीकरण करुन समाज माध्यमातुन, वृत्तवाहीनीवर प्रदर्शित करणे, काठ्यांनी बेदम मारणे, पोलीसांची ही कृती मानवाधिकारांचे उल्लंघन असुन, त्यांना मीळालेल्या अधिकारांचा गैरवापर सुरु असुन, नागरिकांना अशी अमानवी शिक्षा देउन, त्यांची प्रतीमा मलीन करणे हे चुकीचे असल्याचे, न्यायाधिश देव यांनी आपल्या आदेशात नमुद केले आहे.

न्यायाधिश देव पुढे असेही म्हणाले की, अतिशय गंभीर परिस्थीती मध्येही पोलीसांना अतिशय कठोर शिक्षा करण्याची तरतुद कायद्यात आहे. मात्र व्यक्ती विनय महत्वाचा आहे व या करीता पोलीस आयुक्तांनी स्वत: लक्ष घालुन, पोलीसांकडुन अशाप्रकारचे कृत्य पुन्हा घडु नये या साठी प्रयत्न करावे, जर कोणताही नागरिक नियमांचे उल्लंघन करत असेल तर त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी,कायद्यात प्रत्येक बेकायदिशीर कृत्यासाठी शिक्षा देण्याची तरतुद दिलेली आहे. मात्र यापुढे मानवाधिकारांचे उल्लंघन होउ नये, कायद्याच्या राज्यात असे प्रकार अमानवीय आहे, अशा शब्दात चपराक ओढुन तसे निर्देश आपल्या आदेशात न्यायालयाने नोंदवले व या बाबत संबंधीत पोलीसांवर केलेल्या कार्यवाहीचे सविस्तर प्रतिज्ञा पत्र दाखल करावे, असे नमुद केले.

या बाबत बोलताना शहरातील ज्येष्ठ विधिज्ञ प्रदुम्न्य देशपांडे (पी डी) म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशाकडे पोलिसांनी गंभीरपणे पाहणे गरजेचे आहे, अन्यथा पोलिसांकडून असे प्रकार सुरूच राहिल्यास, उच्च न्यालायाचा अवमान होईल व अनेक अवमान याचिका दाखल होतील. तरी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी या बाबत पोलिसांना योग्य त्या सूचना देणे गरजेचे आहे. पीसीपी/डीजे/११ ३०

Share This
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top