राष्ट्रीय आपत्ती मध्ये कर्तव्य बजावलेल्यांना सेवा पदक अथवा तत्सम पदक — गृह विभाग महाराष्ट्र
पीसीपी वृत्तसंस्थेच्या बातमीचा परिणाम
पीसीपी वृत्तसंस्था पुणे प्रतिनिधी : कोव्हीड १९ सारख्या राष्ट्रीय आपत्ती काळात महाराष्ट्र पोलीसदलातील कर्मचारी व अधिकारी यांनी बजावलेल्या कर्तव्याबद्दल, आपत्ती अथवा तत्सम पदक देवुन गौरव करण्याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या गृह विभागाचे उप-सचिव कैलाश गायकवाड यांनी गृह मंत्री अनिल देशमुख यांचे टीपणी वरुन पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांना पाठवल्याचे पीसीपी वृत्तसंस्थेला कळवण्यात आले आहे.
या बाबत गृह मंत्री देशमुख यांनी आपल्या टीपणी मध्ये नमुद केल्या प्रमाणे, मार्च २०२० पासुन राज्य पोलीसदलातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अविरतपणे कोव्हीड १९ च्या आपत्तीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी मुकाबला करुन समाजातील कायदा व सुव्यवस्था राखणे, तसेच जनमानसात सुरक्षा व सामाजीक बांधीलकी कायम ठेवण्याकरीता झटत आहेत, करोनाच्या लढाईत मुख्यत्वेकरुन पोलीस शिपाई व निरिक्षक पदावरील कर्मचारी खंबीरपणे आपआपले कर्तव्य बजावण्याकरीता प्रयत्नशील आहेत. तसेच यातील अनेक कर्मचारी व अधीका-यांना स्वत:च्या आरोग्याची जोखीम उठवावी लागली तर अनेकजणांना आपले प्राण गमवावे लागल्याचे आढळुन आले आहे.
त्याकरीता अशा सर्वांचे कौतुक करुन प्रोत्साहन देणे कामी गृह विभागाने या सर्वांना आपत्ती सेवा पदक अथवा तत्सम पदक देवुन त्यांबाबतचा सविस्तर प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश गृह मंत्री यांनी दिल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच हा प्रस्ताव तातडीने शासनास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
या बाबत काही दिवसापुर्वी पीसीपी वृत्तसंस्थने आपल्या “”पुणे क्राईम पॅट्रोल”” च्या माध्यमातुन “”पोलीसांच्या कर्तव्य व आरोग्याचे काय””? असा प्रश्न बातमीच्या माध्यमातुन समाज व प्रशासनासमोर उपस्थीत केला होता. पीसीपी/डीजे/११ ४५
