तापमान मोजणी यंत्र पोलीसांना सुपुर्त करताना राज व सुभाष जैन,सह पोलीस आयुक्त डाॅ रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे
लाॅकडाउनच्या ४० दिवसानंतर सुद्धा पोलीसांकडे ताप नियंत्रक उपकरण नाही
पुढे आला एक “देवदुत”, दान केली ५१ उपकरण
पीसीपी वृत्तसंस्था पुणे प्रतिनिधी : करोनाच्या विरोधातील लढाई मध्ये सर्वात आघाडीवर असलेल्या पोलीसांना लाॅकडाउन च्या ४० दिवसानंतर सुद्धा या विषाणु चा संसर्ग रोखण्या करीता आवश्यक वैद्यकिय उपकरण अथवा सुवीधांपासुन वंचित रहावे लागत आहे. यामुळे आता पोलीसच या विषाणु च्या विळखत अडकत असल्याचे दिसुन येत आहे.
हीच बाब लक्षात आल्यानंतर शहरातील उद्योजक राज जैन यांनी, मनुष्याच्या शरीरातील तापमान मोजणी करण्याची ५१ (आधुनिक ईंन्फ्रारेड थर्मामीटर) तपासणी यंत्र, आज सह पोलीस आयुक्त डाॅ रविंद्र शिसवे यांचे कडे सुपुर्त केली.
दिवसें दिवस करोनाचे रुग्ण वाढत आहे व त्यातच आता पोलीसांनाही संसर्ग होत आहे. पोलीसांकडे बंदोबस्त करताना या तापमान चाचणी यंत्राची मोठी गरज होती. आता पोलीस ईत्तरांबरोबर स्वताचेही तापमान मोजु शकणार आहे. शहरात १०० पेक्षा जास्त ठीकाणी पोलीसांचा सर्वसामान्य नागरिकां बरोबर संपर्क येत असतो, यातुन करोनाचा संसर्ग वाढत आहे, पोलीस थेट नागरीकांची तपासणी करत असल्यामुळे त्यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न उभा राहीला आहे.
पोलीसांच्या आरोग्याबाबत सरकार खुप उशीरा जागे झाले आहे मात्र अध्याप, पोलीसांना बंदोबस्तावर आवश्यक असलेल्या वैद्यकिय सुवीधा व उपकरणा बाबत खुपच पीछाडीवर आहे. या करीता समाजाने पुढे येण्याची गरज आहे. या महामारीत ज्या वस्तुंची मोठी गरज आहे त्यावर सरकारने लक्ष केंद्रीत करने महत्वाचे राहील.
या यंत्रामुळे पोलीसांना काही प्रमाणात दिलासा मीळाला आहे. ही यंत्र अर्पण करताना राज जैन यांचे बरोबर त्यांचे भाउ सुभाष व गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे हजर होते. पीसीपी/डीजे/१८ ४५
