झोपडपट्टीत राहणा-या परिवाराकरीता धावुन आले अप्पर पोलीस आयुक्त
पुणे पीसीपी वृत्तसंस्था प्रतीनिधी : लाॅकडाउनच्या काळात कोणा समोर काय संकट उभे ठाकेल याचा कोणताही ठावठीकाणा नसतो, मात्र समाजात अंगावर वर्दी चढवलेले काही अधिकारी असतात जे कायम माणुस्की जपत येत असतात.
शहरातील जनता वसाहतीमध्यील एका परिवारासमोर लाॅकडाउन मध्ये अडकुन पडल्यामुळे अनेक दिवसांपासुन अनेक प्रश्न निर्माण झाले होते, अनेक सरकारी कार्यालयांच्या पाय-या झिजवल्या मात्र सर्वच ठीकाणी अपयशाची घंटा वाजत होती. सिंहगड रस्त्यावरील पु ल देशपांडे उद्यानासमोरील एका सहकारी संस्थेत या परिवारातील सदस्य, ईमाने ईतबारे आपले कर्तव्य निभावत होते. मात्र लाॅकडाउन सुरु झाले व यांचेवर आकाशच कोसळले, या परिस्थीतीत सहकारी संस्थेतील रहीवासी त्यांच्या मागे उभे राहीले, वेळोवेळी त्यांना योग्य ती आर्थीक मदत, रोजच्या रोज सर्व जीवनाश्यक वस्तु पुरवल्या जात होत्या, पण त्यांच्या लहान मुलांना आपल्या गावी परतायची ओढ लागली होती, त्यामुळे सर्वजण गोंधळुन गेले होते. संस्थेतील अनेकांनी या मुलांना गावी पोचवण्यासाठी आवश्यक परवानगी मीळणेकरीता प्रयत्नांची शिरकाष्ठातता केली, सरकारी कार्यलय व पोलीस ठाण्यात चकरा मारल्या, पण काहीच उपयोग झाला नाही. मनोज मोरे या सभासदाने गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना संपर्क करुन सर्व वस्तुस्थीती मांडली.या परिवाराला सोडण्यास स्वताचे वाहन देत असल्याचे सांगीतले. मोराळे यांनी त्यांना त्वरीत ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास सांगीतले व अवघ्या तासाभरात या परिवाराला सोलापुर येथे जाण्यास परवानगी देण्यात आली.
परवानगी मीळाल्याची बातमी कळताच या परिवाराला व संस्थेतील सभासदांना खुप आनंद झाला व पोलीस खात्याबद्दल त्यांचा विश्वास वाढला. या बाबत पीसीपी वृत्तसंस्था प्रतीनिधी बरोबर बोलताना मनोज मोरे म्हणाले की, आम्ही तर आशाच सोडुन दिली होती, आम्हाला या लहान मुलांचा आक्रोश पहावत नव्हता, पण पोलीस खात्यात जो पर्यंत मोराळे साहेबांसारखे अधिकारी आहेत, तो पर्यंत सर्वांना नक्कीच न्याय मीळेल.पीसीपी/डीजे/१७ ३०
