शेतक-याची जमीन बळकावण्याचा गुंडानी केला प्रयत्न
शहरातील प्रतिष्ठीत व्यापा-यावर संशयाची सुई
आरोपीकडुनच पोलीसांवर दबाव
पीसीपी वृत्तसंस्था पुणे प्रतिनिधी : लाॅकडाउनच्या काळात शिक्रापुर भागात काही गुंडानी जमाव जमवुन शेतक-याची जमीन बळकावण्या प्रयत्न केला मात्र तो फसला. या बाबत शिक्रापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणत आला असुन, पोलीसांवर दबाव असल्यामुळे अध्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
या बाबत शेतकरी सोपान लंके यांनी फिर्याद दाखल केली असुन, आरोपी प्रफुल्ल शिवले व दोन अज्ञातां विरोधात पोलीसांनी भा द वि चे कलम ४४७,४२७,५०४,५०६ व ३४ नुसार या सर्वां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लंके यांची शिक्रापुर येथे ८ हेक्टर जमीन असुन व्यवसायात नुकसान झाल्यामुळे विक्री करण्याचे ठरवले. बाजाभावानुसार सदर जमीनीची जवळपास १८/१९ कोटी रुपये किम्मत अपेक्षीत होती. सदर जमीन पुणे येथील सोहेल सोमजी यांनी १० कोटी रुपयांस घेण्याची तैयारी दर्शवली. बाजारातील मंदी पाहुन लंके यांनी सोमजी यांना १० कोटी ५ लाख रुपयांना खरेदी देण्यास काही अटी शर्तींवर मंजुरी दिली, त्यानुसार सर्व पैसे २ महीन्यात मीळाले तरच जमीनीचा ताबा सोमजी यांना देणार असे ठरले. त्यानुसार सोमजी यांनी १० धणादेश २४ फेबु २०२० रोजी खरेदीखत नोंदविताना लंके यांना दिले. सोमजी यांनी दिलेल्या १० धणादेशां पैकी पाच वटले व पाच खात्यात पैसे नसल्यामुळे परत गेल्यामुळे लंके यांनी वकिलामार्फत सदर खरेदीखत रध्द केल्याबाबत सोमजी यांना नोटीस दिली. असे असताना प्रफुल्ल शिवले व त्याच्या २/३ साथीदारांनी लाॅकडाउनच्या काळात त्यांच्या जमीनीत बेकायदेशिरपणे घुसुन तेथील कामगारांना मारहाण करुन, तेथील लंके यांच्या नावाचा फलक तोडुन टाकला व कामगारांनी त्वरीत तेथे असलेली त्यांची घरे खाली करण्याची धमकी दिली.
या बाबत लंके यांनी २३ मे रोजी तक्रार दाखल केली. शिवले याचा या परिसरात दबदबा असल्यामुळे पोलीसांवर मोठा राजकीय दबाव आहे व त्यामुळे पोलीस त्याला व त्याच्या साथीदारांना अटक करत नसल्याचा आरोप लंके यांनी लगावला.PCP/DJ/11 30
