गावी जाण्याचे “स्वप्न” सत्यात उतरवले “स्वप्ना गोरे” यांनी–
४५ दिवसांचे “स्वप्न” अखेर झाले पुर्ण
पुणे १२ मे २०२० पीसीपी वृत्तसंस्था प्रतिनिधी : लाॅकडाउन च्या ४५ दिवसानंतरही गावी जाण्याचे “स्वप्न” पुर्ण होणार का नाही या विवंचनेत अडकलेल्या २० चहा विक्रेत्यांचे “स्वप्न” सत्यात उतरवण्यासाठी धावुन आले पुणे पोलीस.
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे २० राजस्थानी चहा विक्रेते अक्षर्शा पायी निघण्याच्या तयारीत होते, तसेही हे राजस्थान चे रहिवासी असल्यामुळे त्यांना या भर उन्हात चालण्याचा मोठा सराव आहे, पण २ हजार कीलोमीटर दुर असलेल्या गावी पोचण्यास कीती कालखंड लागेल याचा कोणताही नेम नव्हता, गेले अनेक दिवस ते पोलीस ठाण्याच्या पायर्या झीजवत होते पण अशिक्षीत असल्यामुळे अनेक अडथळे पोलीसां समोर आ वासुन उभे होते. मात्र एका पत्रकाराच्या निर्दशनास ही बाब आली व कोणताही मुलाहीजा न बाळगता या पत्रकाराने संबंधीत परिक्षेत्राच्या पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे यांचे कानावर ही बाब घातली. गोरे यांनी त्वरीत दखल घेउन दि १०, रविवारी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक चुडाप्पा यांना त्वरेने या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले.
चुडाप्पा यांच्या कर्मचा~यानी या सर्वांना भरपुर मदत केली तसेच या पत्रकाराने स्वत: या सर्वाचे लेखी अर्ज दाखल केले व या अर्जांवर जिल्हाधिकारी नवल किशोर, आर डी सी जयश्री कटारे यांनी त्वरीत कारवाई करुन सोमवारी दि ११ रोजी या सर्व चहा विक्रेत्यांना राजस्थान येथे पाठवले.
या बाबत बोलताना यातील एक चहा विक्रेता नथुराम पटेल आमच्या प्रतिनिधी बरोबर बोलताना रडु लागला व त्याला प्रशासन व पोलीसांचे आभार कसे मानावे हे सुचतच नव्हते. तो म्हणाला की ईतके दिवस आम्हाला वाटले की आमचे कोणीच नाही पण आज कळाले की या जगात अजुनही चांगले सरकारी अधिकारी, पोलीस, पत्रकार व सरकार आहे, या सर्वांचे ऋुण आम्ही कधीच फेडु शकणार नाही. सोमवारी सायंकाळी या सर्वांना पी एम पी एल च्या विशेष बस ने पुणे रेल्वे स्थानकावर नेण्यात आले, तेथे या सर्वांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली, तसेच प्रवासा मध्ये खाण्याचे साहीत्य, पाण्याच्या बाटल्या, बिस्कीटचे पुडे व रेल्वेप्रवासाचे तीकीट देण्यात आले. सर्वात महत्वाचे हे सर्व मोफत असल्याचे त्यांना कळाले तेव्हा तर सर्वचजण रडायला लागले. पोलीसांनी त्यांना सावरले व या सर्वांनी सरकार चे आभार मानले.
या चहा विक्रेत्यांचे आपल्या गावी जाण्याचे “स्वप्न” सत्यात उतरवण्यासाठी तसेच समोर असलेल्या संकटावर “जय” मीळवन्यासाठी “स्वप्ना गोरे” व “जयश्री कटारे” यांनी आपले कर्तव्य पार पाडले. पीसीपी/डीजे/११ ४५
