पोलीसांनो, आपल्या घरी आपली कोणीतरी वाट पहात आहे
नका घालु आपला बहुमोल जीव धोक्यात
करोनाच्या लढाईत पोलीसांचाच जात आहे बळी
संसर्ग झालेल्यांचे सुरु आहेत हाल
ईस्पितळात पैसे भरल्याशिवाय दाखल करुण घेतले जातच नाही
पुणे /मुंबई पीसीपी वृत्तसंस्था : करोनाच्या लढाईत सर्वात आघाडीवर असलेल्या पोलीसदलाचे करोना विषाणु चा संसर्ग झाल्यानंतर खुप हाल सुरु असल्याचे अनेक घटनांमधुन सिद्ध झाले आहे. “धरले तर संसर्ग होण्याची भीती, सोडले तर वरिष्ठांच्या शिव्या. या न्यायाने जीव मुठीत घालुन सद्यस्थीतीत पोलीस कर्तव्य निभावत आहेत.
प्रसिद्धी साठी अनेक जण हापापलेले दिसत आहेत मात्र ते हे नेहमीच विसरत आले की त्यांच्या “”घरी कोणीतरी त्यांची वाट पाहतोय””. शहराच्या मध्यवस्तीतील पोलीस ठाण्यात एका कर्मचा~याला करोनाची लागन झाली, मात्र त्याला उपचार मीळणे एैवजी मनस्तापच मीळाला. संसर्गाची वेळेत दखल न घेतल्यामुळे संपुर्ण ईमारतच “सिल” करण्यात आली. करोना विषाणुच्या संसर्गला रोखण्याकरीता आवश्यक कोणत्याही वैद्यकिय सुविधा पोलीसांना मीळत नसल्यामुळे, अनेक कर्मचा~यांना पुढील काही दिवसात संसर्ग होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्यावरुन मोकाट फिरणा~यांवर ज्या काठ्यांनी प्रसाद दिला जात आहे, त्या काठ्यांना निर्जंतुकीकरण न केल्यामुळे प्रसाद खाणा~यांना तर नक्कीच संसर्ग होत आहे पण त्याच बरोबर जे पोलीस या काठ्या बाळगत आहेत त्यांना सुद्धा संसर्ग होण्याची भीती “आयुषच्या” तत्कालीन सह संचालक डाॅक्टर सरिता गायकवाड यांनी व्यक्त केली आहे कारण ज्यांना काठ्यांनी झोडपले जात आहे त्यांना संसर्ग आहे का नाही हे कळायला कोणताही मार्ग नाही, तसेच त्या काठ्या पोलीस स्वता:कडे वाहत असल्यामुळे त्यांच्या परिवाराला सुद्धा धोका पोहचु शकतो, असे गायकवाड यांनी सांगीतले.
शहर पोलीसदलात जवळपास ११ हजार तर मुंबईदला मध्ये मध्ये ६० हजार पोलीस कर्तव्यावर आहेत, मुंबई येतील परिस्थीती काही वेगळी नाही, नवी मुंबई येथील एका कर्मचा~याला “करोना” लागन झाल्यानंतर ५ तास कोणत्याही ईस्पितळात दाखल करुन घेतले गेले नाही, २ लाख रुपये भरले तरच उपचार करण्यात येतील असे बहुप्रतिष्ठीत फोर्टीस रुग्णालयतुन सांगण्यात आले, शेवटी नवी मुंबई चे पोलीस आयुक्त संजयकुमार, उपायुक्त प्रशांत कदम व ईत्तर अधिका~यांनी मध्यस्ती करुन २० हजार रुपये भरले त्यानंतरच या पीडीत पोलीसाला रुग्णालयात दाखल केले गेले. एवढे मोठे अधिकारी मध्यस्ती करत असताना या पोलीसाच्या परिवाराचे काय हाल झाले, त्याबाबत तेथील एका कर्मचा~याने आवाज उठवल्या नंतर ही घटना उघडकीस आली.
वृत्तपत्रात छायाचित्र अथवा दुरचित्रवाणी वर प्रसिद्धी वा आपली छवी दिसण्यासाठी पोलीसांनी त्या आधी हे विसरु नये की त्यांची लढाई “करोना”” च्या संसर्ग सोबत आहे, हे लक्षात ठेवुनच आपले कर्तव्य पार पाडायचे आहे, तसेच घरी आपला परिवार वाट पाहतोय, हे पोलीसांनी विसरु नये असे. आपला जीव नाहक धोक्यात घालु नये, बंदोबस्तावर असलेल्या सर्वच पोलीस कर्मचारी, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, त्यांचे वरील अधिकारी यांनी नागरिकांच्या जवळ बीलकुल जाउ, वहाने तपासताना हात मोजे वापरावेत, चेह~यासमोर काचेचे आवरण लावावे, तपासणी झाल्यावर हातमोजे बदलावे, प्रतेक वेळी हात धुवावे, हे सर्व करत असताना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य द्यावे, असे डाॅक्टर गायकवाड यांनी आवाहण केले आहे. “जान है तो जहां है”” हा पंतप्रधानांचे घोषवाक्य लक्षात ठेवावे. पीसीपी/डीजे/११ ४५

Devendra Jain
May 3, 2020 at 3:02 am
Important news