Pune Crime

POLICE NABS 2 WHILE TRANSPORTING FOREIGN LIQOR

</a>
विदेशी मद्यसाठासह स्विफ्ट कार व दोन आरोपींना शहर पोलीसांनी गजाआड केले
.

धुळे दी.19 मे : देशात लॉक डाऊन सुरू असताना विदेशी मद्य साठासह वाहतूक करताना एक मारुती स्विफ्ट कार व दोन जणांना कारवाई करुन शहर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेली माहिती की, देशात लॉक डाऊनचा चौथा टप्प्याला सुरवात झाली आहे.शहर पोलीस स्टेशन मधील पो.नि.हेमंत पाटील यांना खबरी मार्फत गोपनीय माहिती मिळाली.त्या आधारे त्यांनी एक पोलीस पथक तयार करून साक्री रोड कुमार नगर जवळ नाकाबंदी लावून वाहन तपासणीस सुरवात करण्यात आली.पोलीस कर्मचारी हे वाहन तपासणी करत असताना एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार समोरून येताना दिसली पोलीसांनी त्या गाडी अडवून तपासणी केली असता गाडी मागील सिट जवळ व डिक्कीत कागदी खोक्यात ईम्पेरीयल ब्लु विदेशी मद्याच्या बाटल्या आढळल्या . लॉक डाऊन परिस्थिती सुरु असताना गाडीतून अवैधरित्या वाहतूक करताना त्या बाबत कारण विचारले असता योग्य ती माहिती न उडवाउडवीची उत्तरे दिली.लगेचच पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले.

शहर पोलीस ठाण्यात आणून योगेश शरद खोपडे वय.30 रा.गल्ली नं.4 विठ्ठल मंदिर जवळ धुळे व कुणाल विठ्ठल रायकर वय.31.रा.पश्चिम हुडको पवन नगर धुळे. दोघांकडुन एक मारुती स्विफ्ट कार क्रं. एम एच 15 / ईएक्स 1589 व विदेशी मद्य साठा केलेला माल असा एकूण 2 लाख 64 हजार 420 रुपयांचा जप्त करण्यात आला आहे. दोघांना विरूद्ध हे कॉ मनिष सोनगीरे यांनी फिर्याद दाखल करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


सदर कारवाई हि जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित अप्पर पोलिस अधिकारी डॉक्टर राजू भुजबळ,शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाने पो कॉ.व्हि आर भामरे,पि डी पाटील,एन के पोतद्दार आदींनी केली आहे.पीसीपी/डीजे/१८३०

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top