लॉकडाउन शिथिल करणे म्हणजे ग्रीन झोन चे रेड झोन करण्याला आमंत्रण — संदीप खर्डेकर
सारासार विचार न करता घाईघाईने घेतलेला निर्णय आत्मघातकी
महसूल वाढवायचा की माणसे वाचवायची हा निर्णय घेण्याची वेळ.
सर्वत्र सामाजीक अंतर राखण्याचा बोजवारा आणि विना मास्क फिरणाऱ्यांची गर्दी
पीसीपी वृत्तसंस्था पुणे प्रतिनिधी : लॉकडाउन शिथिल करणे म्हणजे ग्रीन झोन चे रेड झोन करण्याला आमंत्रण दिल्या सारखे आहे तसेच हा निर्णय सारासार विचार न करता घाईघाईने घेतलेला आत्मघातकी आहे व याच बरोबर महसूल वाढवायचा की माणसे वाचवायची असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे नेते संदीप खर्डेकर यांनी राज्याच्या उप मुख्यमंत्र्यांना लीहलेल्या पत्रात विचारला आहे तसेच या निर्णयाचा सरकारने पुर्नविचार करावा, अशी मागणी या पत्रात केली आहे.
खर्डेकर यांनी आपल्या पत्रात अनेक मुद्दे सरकारच्या निर्दशनास आणले आहेत, त्यात प्रामुख्याने सर्वत्र सामाजीक अंतर राखण्याचा उडालेला बोजवारा आणि विना मास्क फिरणाऱ्यांची गर्दी याचा उल्लेख आहे तसेच
पुणे शहराचे सर्वच प्रशासकीय अधिकारी अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांच्या निर्णयांमुळे व उलटसुलट वक्तव्यांमुळे गेले काही दिवस पुणेकर गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.एखादा निर्णय घोषित केला जातो आणि प्रत्यक्ष वेगळेच चित्र दिसते हे सद्य स्थितीत अत्यंत दुर्दैवी आहे.
परिपत्रक काढताना ना पूर्वतयारी ना तारतम्य ना विविध खात्यात समन्वय असेच चित्र गेले काही दिवस दिसत होते आणि काल मध्यरात्री मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढलेल्या शिथिलतेच्या परिपत्रकामुळे आज तर पुणे शहराच्या ग्रीन झोन मधे उसळलेली गर्दी ही भयावह आहे.काही ठिकाणी दुकाने सुरु तर काही ठिकाणी बंद, खासगी कार्यालये व इतर दुकाने ,पेट्रोलपंप, यांच्या बद्दल अनिश्चितता, घरकाम करणाऱ्यां बद्दल स्पष्टता नाही. वारजे चौकात झालेली परप्रांतीय कामगारांची गर्दी आणि पोलिसांचा लाठीचार्ज किंवा कर्वे रस्त्यावरील तळीरामांची गर्दी धडकी भरविणारीच, असल्याचे पत्रात नमुद आहे.
आत्तापर्यंत पुणेकरांनी बहुतांश शहर कोरोनामुक्त राखण्यात यश मिळविले आहे. सद्यस्थीतीत १० पोलिस स्टेशन च्या हद्दीत कोरोनाचा फैलाव राखण्यात यश मिळाले असले तरी आजचा निर्णय हा कोणत्याही विचारक्षम व्यक्तीस भीतीदायक वाटावा असाच. असल्याचे पत्रात नमुद आहे. दिवसभर उघडण्यात आलेली दुकाने ही ग्रीन झोन ला रेड झोन कडे नेणारीच. शहरामध्ये सर्वत्र जागोजागी विनामस्क हिंडणारे नागरिक आणि सर्वत्र सामाजीक अंतर (Social distancing) राखण्य्याच्या योजनेचा उडालेला बोजवारा, हा शासकीय निर्णय चुकल्याचेच निदर्शक आहे. नागरिकांनी ह्या शिथिलतेचा अर्थ जणू कोरोना चा धोका टळला,असाच घेतल्याचे, पत्रात म्हटले आहे.
आज तथाकथित कंटेंट्मेंट झोन ( रेड झोन ) मधील नागरिकांचा ग्रीन झोन मधे मुक्त संचार झाल्याचे ही निदर्शनास आले आहे,
तरी आपण त्वरित सर्व संबंधीत यंत्रणा प्रमुखांची बैठक घ्यावी व ह्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी आग्रही मागणी खर्डेकर यांनी केली आहे.पीसीपी/डीजे/१९ ३०
