नवजात बाळंतीण करीता धावुन आले अप्पर पोलीस आयुक्त
पीसीपी वृत्तसंस्था पुणे प्रतिनिधी : करोनाच्या लढाईत संपुर्ण देशातील पोलीस यंत्रणा २४तास, ७ ही दिवस सर्वात महत्वाची भुमीका बजावत आहे. कायदा सुव्यवस्था बरोबर अनेक नवीन गोष्टींचा व्याप पोलीसदलाला वाढला आहे. अनेक रुग्णालयांचा बंदोबस्त, रुग्णांवर देखरेख, वाहन व्यवस्था, अश्या अनेक सामाजीक समस्यांचे निराकारण करावे लागत आहे. हे सर्व करत असताना अनेक पोलीसांना करोनाची लागन झाल्यामुळे आपले जीव गमावले आहेत. मात्र याही परिस्थिती मध्ये माणुस्की जोपासण्याचे कार्य सुद्धा यांचे यांचे हातुन घडत आहे.
शहरातील सातारा रस्ता परिसरातील एका ईस्पितळात एक युवती बाळंतीण झाली, सदर युवतीचे हे पहीलेच बाळंतपण असल्यामुळे तीचे पती, ज्येष्ठ सासु सास-यांना खुप आनंद झाला. बाळंतपणानंतर नवजात अर्भकाची घ्यावयाची काळजी बाबत लाॅकडाउन मुळे त्या युवतीसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे तीला तीच्या माहेरी सांगली येथे जाणे गरजेचे होते. त्याकरीता तीच्या पतीने पोलीसांकडुन पास मीळण्याकरीता अर्ज केला, पण तो नामंजुर झाला कारण बाहेरगावी जाण्याकरीता हजारो अर्ज पोलीसांकडे रोज येत आहेत त्या करीता पुणे पोलीसांची गुन्हे शाखा सर्व धोके पत्करुन अहोरात्र काम करत आहे. या शाखेचे पोलीस उप-ायुक्त बचनसींग, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे व त्यांचे अनेक अधिकारी व कर्मचारी तर गेले २ महीने १६/१७ तास काम करत आहे.
आपला अर्ज नामंजुर झाल्याचे आपल्या पतीकडुन कळताच ती युवती मनाने खुप खचली व ही बाब अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना त्यांच्या एका कर्मचा-याने कळवली. हे कळताच मोराळे यांनी तीच्या पतीला संपर्क साधुन परत अर्ज करण्यास सांगीतले. तीच्या पतीला तर विश्वासच बसत नव्हता की त्यांना संपर्क केलेली व्यक्ती ही शहर पोलीसदलातील गुन्हे शाखे चे एक मोठे अधिकारी आहेत, ही बाबच विश्वासार्ह नाही असे त्याच्या मीत्रांनी सांगीतले. तसेच प्रवास करण्याचा परवाना अर्ज केल्या बरोबर मीळत नाही, हे पण त्याला कळाले त्यामुळे तो अधिक हीरमुसला. मोराळे यांनी सांगुन सुद्धा तीच्या पतीने परत अर्ज केला नाही, तेव्हा परत मोराळे यांनी त्यांना संपर्क साधला, हे पाहुन तीच्या पतीला धक्काच बसला. मोराळे यांनी पाठवलेल्या लींक वर त्याने अर्ज केला व तासाभरात त्या नवजात बाळंतणीला सांगली येथे जाण्याकरीता पुणे पोलीसांनी परवानगी दिली.
पीसीपी वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधी ने जेव्हा या युवतीला संपर्क केला तेव्हा ती परवाना मीळाल्याच्या आनंदात होती व तीच्या डोळ्यातुन आनंदाश्रु वाहु लागले व या परिवाराचा पोलीसांबद्दलचा विश्वास खूप वाढला. या बाबत पीसीपी वृत्तसंस्था प्रतिनिधी ने मोराळे यांचेशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगीतले की, “”मी फक्त माझे कर्तव्य पार पाडले””,. अहोरात्र मेहनत करुन नागरीकांच्या जीवाचे रक्षण करणारे पोलीस, कायदा सुव्यवस्था सांभाळुन सामाजीक काम करण्याचेही भान ठेवतात हे या कृतीतुन सिद्ध झाले. मोराळे यांनी काही दिवसापुर्वीच जनता वसाहत मधील एका परिवाराला अशीच मदत केली होती.पीसीपी/डीजे/१२ ३५
