Pune Crime

GOVERNMENT PAID 5 LAKH RUPEES DUE TO MISBEHAVIOR OF COP FROM PUNE

अगोदर “”सेवेतुन काढण्यात का येउ नये”” अशी नोटीस बजावलेल्या पोलीसाला परत दुस-या प्रकरणात पांच लाखांचा दंड

या पोलीसाच्या कृत्यामुळे २०१५ मध्येच सरकारला भरावे लागले होते पाच लाख

पीसीपी वृत्तसंस्था पुणे प्रतीनिधी : शहर पोलीदलातील अनेक पोलीस कर्मचारी व अधिका-यांच्या दुषकृत्यांमुळे शहर पोलीसदलाची मान खाली जात आहे. निलंबीत झाल्यानंतर सुद्धा आर्थीक घडामोडींच्या मदतीने व मीळत असलेल्या फुकटच्या लाभामुळे वरिष्ठ अधिकारी या कडे करत आहे व त्यांच्या मदतीने पोलीसांचे पुनर्वसन होत असल्यामुळे, अनेक कुकर्म व गंभीर गुन्हे दाखल असलेले, निर्ढावल्याचे अनेक वेळा सिद्ध झाले आहे.

एका प्रकरणात बेकायदेशिरपणे डांबलेल्या व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात ७ जानेवारी २०१४ रोजी याचीका दाखल करुन न्याय मागीतला होता. या बाबत न्यायालयाने कठोर कारवाई करुन पुणे पोलीसांना पाच लाख दंड ठोठावला होता व सदर रक्कम ८ आठवड्याच्या आत याचीकाकरत्याच्या पत्नीला महाराष्ट्र सरकारने १४ फेब २०१५ रोजी अदा केली होती.

या प्रकरणात सामील असलेले गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार रमेश पंडीतराव वाघमारे व सुधीर आनंदराव घोटकुळे यांना पाच वर्षानंतर आज, सदर पाच लाख रुपये त्यांच्या मासीक वेतनातुन ५० टक्के प्रमाणे वसुल का करण्यात येउ नये? अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती त्यावर अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी शिक्का मोरतब करुन सदर पाच लाख रुपये या दोन्ही पोलीसांकडुन वसुल करण्याचे आदेश जारी केले. या दोन्ही पोलीसांनी त्यांच्या कर्तव्यात निष्काळजीपणा करुन, शासनाचे नुकसान केले तसेच त्यांचे वर्तन अशोभनिय, बेपर्वा, बेजबाबदार असल्याचे नमुद करण्यात आले आहे.

सुधीर घोटकुळे व शिवाजी कुबेर जाधव यांनी २०१८ मध्ये कुख्यात गुंड गजानन मारणे याचे कडुन एक कोटी दहा लाख रुपये खंडणी मागीतली होती. त्याबातच्या चौकशी मध्ये या दोघांना “”पोलीसदलाच्या सेवेतुन काढुन का टाकु नये”” अशी अंतीम नोटीस बजावण्यात आली होती. या दोघांनी त्यावेळच्या वरिष्ठ अधिका-या बरोबर सुत जुळवुन, स्वत:च्या नोक-या नाम मात्र शिक्षेवर राखल्या. विशेष असे की २०१५ मध्ये घोटकुळेच्या कारनाम्यामुळे पोलीसदलाला पाच लाख रुपये दंड झाला, हे माहीत असुनसुद्धा संबंधीत वरिष्ठ अधिका-याने यांना परत झुकते माप दिले.

शहर पोलीसदलात असे अनेक घोटकुळे कार्यरत आहेत ज्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत, अनेकांनी कैक दिवस कारागृहात काढले आहेत व निलंबीत झाल्यानंतर, वरिष्ठ अधिका-यांची “मर्जी साधुन” परत सेवेत कार्यरत आहेत.

लाॅकडाउन सुरु असताना एका पोलीस निरिक्षकाने बाणेर भागात एका बांधकाम व्यावसाईकाला जबर मारहाण करुन त्याच्या नवीन ईमारतीची भींत, ८/१० गुंड व जेसीबी चा वापर करुन पाडली, मात्र या बाबत एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने स्वत:लक्ष घालुन बांधकाम व्यावसाईकाची फक्त “”अदखलपात्र गुन्हा”” अशी तक्रार दाखल करुन स्वत:च्या अधिका-यांला वाचवले, मात्र कलम १४४ चा भंग, कोवीड १९ कायद्याचा भंग, राष्ट्रीय आपत्ती कायद्याचा भंग, असा एवढा गंभीर “”दखलपात्र गुन्हा”” घडलेला असताना, “”अदखलपात्र गुन्हा”” म्हणुन नोंद केली.

आयपीेएल चे सामने सुरु असताना काही बेटींग घेणा-यांना पोलीसांनी सामना सुरु होण्या अगोदरच अटक केली, व नंतर आरोपींना बेटींग घेण्यास सांगीतले, मात्र हा सर्व प्रकार त्याठीकाणी असलेल्या सी सी टी व्ही कॅमेरा मध्ये कैद झाला, ही बाब पोलीसांना कळालीच नाही व नंतर त्या आरोपींना काही “”लाख”” रुपये घेउन सोडण्यात आले. याची तक्रार त्या आरोपींनी पोलीस आयुक्तांकडे केली व सीसीटीव्ही फुटेज ची सीडी देखील जमा केली. आयुक्तांच्या आदेशाने सहायक पोलीस आयुक्तांनी चौकशी केली व सीसीटीव्ही फुटेज हे ग्राह्य धरता येणार नाही असे सांगुन चवकशी बंद करण्यात आली.

एका तोतया पोलीसाने पोलीस आयुक्तालयातच एका व्यक्तीला लुबाडले, त्याबाबत तक्रार दाखल झाली, पण यात अनेक जण सामील असल्यामुळे त्यावर काहीही कारवाई आजपर्यंत करण्यात आलेली नाही. पीसीपी/डीजे/०९४५

Share This
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top