राज्य कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद
योग्य नियोजनामुळे कारागृहात करोना नियंत्रणात
मृत्युदर व संसर्ग रोखण्यात यश
पीसीपी वृत्तसंस्था पुणे देवेंद्र जैन : करोनाच्या महामारीत संपुर्ण विश्व अडकलेले असताना, आपल्या राज्यातील कारागृहात योग्य नियोजन केल्यामुळे राज्यातील ६० कारागृहात संसर्ग पसरु न देता तसेच बाधीत कैद्यांचा मृत्युदर कमी राखण्यात कारागृहातील अधिकारी व कर्मचा-यांना सद्य:स्थीतीत यश मीळाल्याचे एका पाहणीतुन निष्पन्न झाले आहे.
या बाबत राज्य कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद म्हणाले की, लाॅकडाउनच्या पहील्या दिवसांपासुन आम्ही कसोशीने काळजी घेत आलोय. आमच्या पुढे सर्वात महत्वाचा प्रश्न होता तो सर्वच कारागृहातील गर्दीचा (OVER CROWDED), जवळपास ३८ हजार बंदी कारागृहात बंद होते, त्यामुळे आम्ही याचा आढावा घेउन सरकारला त्वरीत कळवले, तसेच सर्वोच्च न्यायालयाने निर्देषीत केल्या प्रमाणे एक “हाय पाॅवर कमीटी” गठीत करुन जवळपास नउ हजार बंद्यांना, काही अटी व शर्तीवर या कमीटीने जामीन देण्यास मंजुरी दिली. आज रोजी २९ हजार पेक्षा जास्त बंदी कारागृहात आहेत व क्षमता २४ हजार बंद्यांची आहे. मात्र आम्ही रोज बंद्यांना करोना संसर्गाची माहीती देउन जागृकता निर्माण करत आहोत. तसेच सामाजीक अंतर (“”सोशल डीस्टंसिंग”) पाळण्याबाबतच्या सुचनांची पुरेपुर अंमलबजावणी सर्व कारागृहात करत आहोत. बंद्यांनीही प्रतिसाद देउन, सर्व सुचनांचे पालन करत आहेत.
रामानंद पुढे असे ही म्हणाले की, आम्ही अनेक कारागृह थेट “”लाॅकडाउन”” केली, त्यामुळे संसर्ग रोखण्यास मोठे यश मीळाले. तसेच स्थानीक पोलीसांना अडचण होउ नये या करीता “”तात्पुरती कारागृह”” सुरु करण्यात आली. बंद्यांना भेटण्यास नातेवाईक व वकीलांना वीडीओ काॅलींग सुवीधा सुरु करण्यात आली, त्यामुळे बंद्यांना त्यांच्या परिवाराबरोबर संवाद साधता येत आहे, त्याकरीता सर्व कारागृहात “”स्मार्ट”” मोबाईल फोन देण्यात आले आहेत. अशा अनेक सुवीधा पुरवण्यात येत आहे. सद्य:स्थीतीत आम्ही शासनाला जास्तीत जास्त “”तात्पुरते कारागृह”” सुरु करण्याकरीता प्रस्ताव पाठवले आहेत व काही ठीकाणी अशी कारागृहे सुरु करण्यात आली आहेत. नवीन येणा-या बंद्यांची वैध्यकीय चाचणी कठोरपणे केली जात आहे. त्यामुळे संसर्ग पसरण्यास अटकाव झाला आहे तसेच करोना मुळे झालेल्यां बंद्यांचा मृत्युदर रोखण्यात मोठे यश मीळाले आहे. आतापर्यंत फक्त ३ बंद्यांचा मृत्यु झाला आहे व मोजक्याच बंद्यांना संसर्ग झाला आहे.
या बाबत ज्येष्ठ विधीज्ञ अनुप अवस्थी यांनी, कारागृह विभागाच्या कामाची प्रशंसा केली, तेथे ज्या नवीन सुवीधा पुरवण्यात येत आहेत त्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, सरकारने बंद्यांना जामीन देण्यास विरोध केला, त्यांच्यानुसार जामीन मीळालेला बंदी, हीच पोलीसांपुढे मोठी डोकेदुखी ठरणार आहे, सर्व कारागृहात ईस्पितळाची सुवीधा आहे, बंद्यांना जामीन देण्याएैवजी त्यांना त्याच ईस्पितळात क्वारंटाईन करणे हे सोईचे होते तसेच येथील ईस्पितळांना आधुनीक तंत्रध्यानाचा वापर करुन सुसज्ज करणे गरजेचे होते. जामीन मीळालेले बंदी परत येतील याची कोणीही ग्वाही देउ शकत नाही तसेच यात अनेक रेकाॅर्डवरील कुख्यात गुन्हेगार आहेत, ज्यांनी पुणे शहरात जामीन मीळताच खुनासारखे गुन्हे केले आहेत, त्यामुळे सरकारचा जामीन देण्याचा निर्णय पुर्ण चुकीचा असल्याचे, अवस्थी यांनी सांगीतले. PCP/DJ/12 45
