देशी सिगारेटच्या धुराने गुदमरले पोलीस आयुक्तालय
कोणतीही बंदी नसताना सुरु आहे मोठ्या “मांडवली कारवाया””
पीसीपी वृत्तसंस्था पुणे प्रतीनिधी : देशात लाॅकडाउन सुरु झाले आणी सर्वसामन्यांच्या हाल अपेष्टांना सुरुवात झाली. मात्र या ही परिस्थीती मध्ये काही “महाभागांनी” पैसे कमावण्यासाठी बेकायदेशिर मार्गांचा अवलंब सुरु केला आहे व याचा मोठा फटका कायदेशीर असलेल्या सिगारेट व खाण्याची तंबाखु अथवा मीस्री चा वापर करना-यांना.
सध्या पुणे शहरात वरिष्ठ अधिका-यांची दिषाभुल करुन काही महाभागांनी पोलीस कर्मचा-यांना हाताशी धरुन, सिगारेट व काळ्या पत्याची तंबाखु विक्री करणा-यांकडुन लाखो रुपयांच्या मांडवली सुरु केल्या आहेत व या बाबत अति वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ असल्याचे दिसुन येत आहे. यामुळे शहरात कायदेशिर मार्गाने येत असलेल्या सिगारेट व काळ्या पत्याची तंबाखु विकणा-यांवर संक्रात ओढावली आहे.
पोलीसांच्या अत्यंत “जवळच्यांकडुन” सिगारेट व तंबाखु विकणा-यांवर लक्ष केंद्रीत केले जाते व बनावट ग्राहक पाठवुन त्या ठीकाणी धाड टाकली जाते व भारतीय बनावटीचे मार्लबोरो, गोल्ड फ्लेक, ब्रिस्टॉल, चारमीनार, गाय छाप तंबाखु, असा माल जप्त केला जात आहे. काही ठीकाणी परदेशी सिगारेट सुद्धा जप्त केली असल्याचे कळते व त्या बाबत गुन्हे दाखल केले जात आहेत. भारतीय बनावटीची ब्रिस्टॉल सिगारेट गुन्हे शाखेच्या पोलीसांनी जप्त केली, मात्र नोंद करताना परदेशी असल्याचे नमुद करण्यात आले म्हणुन त्याने पीसीपी वृत्तसंस्थेला घडलेल्या प्रकाराची माहीती दिली. धाड टाकण्यामागे गुन्हेगारप्रवृतीचे काही जण यात आपले ईप्सित साध्य करुन घेत असल्याचे वास्तव आहे. “”मांडवली”” झाल्यास लाखोंचा मलीदा मीळतो व गुन्हा दाखल न केल्यास “”तेरी भी चुप और मेरी भी चुप”” या म्हणीनुसार कार्यभाग उरकला जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.
या बाबत अन्न औषध प्रशासनाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांना संपर्क साधला असता, त्यांनी सांगीतले की, बंदी नसलेल्या सिगारेट व खाण्या योग्य तंबाखु वर शासनाने कोणताही प्रतीबंध केलेला नाही तसेच २९ मे २०२० रोजी अन्न औषध प्रशासन खात्याचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी काढलेल्या आदेशानुसार, मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १९६ तील तरतुदीनुसार सार्वजनिक ठीकाणी थुंकण्यास व धुम्रपान करण्यास प्रतिबंध करन्यात आला आहे. या पुढे राज्यात सिगारेट व तंबाखु चे सार्वजनिक ठीकाणी सेवन करता येणार नाही तसेच १८ जुलै २०१३ च्या आदेशानुसार लोकांच्या आरोग्याच्या हितासाठी, स्वादीष्ट, सुगंधी तंबाखु अथवा सुपारीच्या निर्मीती, साठवण, वितरण किंवा विक्री करण्यास महाराष्ट्रात पुर्ण प्रतिबंध करण्यात आला आहे. लाॅकडाउन मध्ये या व्यतिरिक्त कोणतेही आदेश शासनाने दिलेले नाहीत. या माहीतीला याच खात्याचे आयुक्त अरुण उन्हाळे यांनी फोन वरुन दुजोरा दिला आहे तसेच भारतीय बनावटीच्या राज्यात बंदी नसलेल्या सिगारेट व तंबाखु विकण्यास कोणताही प्रतिबंध नसल्याचे सांगीतले.
शहरात पोलीसांच्या भीतीने कोणीही उघडपणे सिगारेट व काळ्या पत्याची तंबाखु विकत नाही. मात्र काळ्या बाजारात या “कायदेशिर” वस्तु मोठ्या दामावर विकल्या जात आहे व याची झळ सामान्य नागरिकांनाच बसत आहे. ५० रुपयांचे सिगारेट चे पाकीट २०० रुपये, १३ रुपयांची गाय छाप काळी तंबाखु ची पुडी ७५ रुपयांना विकली जात आहे. भारतात परवानगी असलेल्या परदेशी नावाच्या मार्लबोरो सिगारेटचे पाकीट थेट २००० रुपयांना विकले जात आहे. त्यामुळे काळा पैसा बेसुमार वाढत आहे. याबाबत आमच्या प्रतीनिधी बरोबर बोलताना शिवसेनेचे नेते अजय भोसले म्हनाले की, लाॅकडाउन मध्ये ४०/५० रुपयांची दारुची बाटली २५० रुपयांना विकली जात होती. सरकारचा महसुल बुडत होता म्हणुन सरकारने दारु विकण्यास परवानगी दिली, याच प्रकारे तंबाखु पासुन उत्पादीत होणा-या अनेक वस्तुंमधुन सरकारला शेकडो कोटी रुपयांचा महसुल मीळत असतो, दारु पिणा-याला एक न्याय व सिगारेट ओढणारा अथवा तंबाखु खाणा-याला वेगळा का? असा प्रश्न भोसले यांनी उपस्थीत केला.
सिगारेट व काळ्या पत्याची तंबाखु वर होत असलेल्या गुन्हे शाखेच्या कारवाई बाबत सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांना विचारले असता, त्यांनी चौकशी करुन सांगतो, असे सांगीतले. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे यांना विचारले असता, त्यांनी सांगीतले की, सिगारेट घेण्याकरीता नागरिक गर्दी करतात व महापालीकेने पानाची दुकाने उघडण्यास प्रतिबंध केला आहे. मात्र ईत्तर ठीकाणी विक्री करणे बाबत काय तरतुद आहे याची अन्न औषध विभागाकडुन माहीती घेउन कळवतो, असे सांगीतले.
एकुणच देशात लाॅकडाउन च्या नावावर सर्वसामन्य नागरिकांची फरपटच सुरु आहे. काळा पैसा कमी करण्याकरीता सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत मात्र “”लाॅकडाउन”” च्या कृपेमुळे काळा पैसा कमी होण्याएैवजी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे वास्तव दिसत आहे. लाॅकडाउन चे शुक्लकाष्ठ कधी संपणार या प्रतिक्षेत सर्वसामान्यां बरोबर लाखो पान विक्रेते आहेत. PCP/DJ/14 45
.
