खाजगी बॅंकांच्या वसुली हस्तकांचा शहरात धुमाकुळ
नागरिक उचलतायेत टोकाचे पाउल
शहरातील व्यापा-याला शिवीगाळ करुन मारहाणीची धमकी
पीसीपी वृत्तसंस्था पुणे प्रतीनिधी : केंद्र सरकार ने देशात लाॅकडाउन जाहीर केल्यानंतर सर्वच बॅकांना कर्ज धारकांच्या हप्त्यांची वसुली करु नये असे आदेश वित्त मंत्री निर्मला सितारामन यांनी जारी केल्यानंतर, या आदेशाला केराची टोपली दाखवुन खाजगी बॅकांची कर्ज वसुली करणा-यांनी सर्वच ठीकाणी धुमाकुळ घातला आहे व या त्रासाला वैतागुन अनेक कर्जधारक आपले जीवन संपवत आहेत व काही जीवन संपण्याच्या मार्गावर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे शहरातील राहुल हीम्मतमल शहा, राहणार, हाईड पार्क, मार्केट यार्ड, यांनी त्यांच्या टाईल्सच्या व्यवसायाकरीता आदित्य बीर्ला फायनांस कंपनी कडुन १५ लाख रुपयांचे कर्ज नोव्हेंबर २०१७ मध्ये घेतले, सदर कर्ज ३६ महीन्यांत करायचे आहे व त्यानुसार शहा हप्ता भरत होते. मार्च २०२० मध्ये देशात लाॅकडाउन सुरु झाले व सर्व व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे केंद्र सरकारने हप्ते भरण्याकरीता नागरीकांना वेळ वाढवुन देण्याचे आदेश केले. या आदेशाला खाजगी बॅकांनी न जुमानता आपल्या वसुली हस्तकांना कर्ज वसुल करण्यास सांगीतले.
याच दरम्यान शहा हे प्रकृती अस्वस्थामुळे ईस्पितळात दाखल होते, तसेच त्यांचे दुकानही बंद होते. मात्र आदित्य बीर्ला फायनांस कंपनीच्या वसुलीवाल्याने शहांना फोन करुन कर्जाच्या हप्त्याची मागणी केली. शहा यांनी त्यांचे जवळपास ३० हप्ते वेळेत भरल्याचे वसुलीवाल्याला सांगीतले व आता सर्व व्यवहार बंद आहेत व दवाखान्यात दाखल आहे, त्यामुळे थोडे दिवस थांबण्यास सांगीतले. काही दिवसांनी वसुलीवाल्याने परत शहांना हप्ता भरण्यास सांगीतले, शहांनी दरम्यान एक हप्ता भरला होता मात्र पुढचे हप्ते हवे म्हणुन वसुलीवाला उद्धट भाषेत बोलु लागला, वादवीवाद वाढल्यावर त्या वसुलीवाल्याने शहांना अत्यंत गलीच्छ भाषेत शिवीगाळ केली व मारहाण करण्याची धमकी दिली. शहा यांनी त्वरीत मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली. पोलीसांना करोनाचा बंदोबस्त असल्यामुळे नंतर पाहु असे शहांना सांगण्यात आले.
शहरात गेल्या काही दिवसात, आर्थीक अडचणींमुळे अनेकांनी आत्महत्या केल्याचे प्रकार घडले आहेत. तसेच नागरीकांना कर्जाचे हप्ते भरण्याकरीता धमकावले जात आहे. आय सी आय सी आय बॅंकेने सुद्धा एका ग्राहकाला क्रेडीट कार्ड चे पैसे बॅंक बंद असताना भरले नाही म्हणुन अवाच्या सवा रक्कम दंड म्हणुन संबंधीत ग्राहकाच्या नावे टाकली आहे. लाॅकडाउन सुरु असताना बॅक व त्यांच्या खाजगी वसुलीवाल्यांनी शहरात धुमाकुळ घातला आहे व बॅंका ग्राहकांच्या नावावर दंड म्हणुन हजारो कोटी रुपये गडप करीत आहे व या बाबत तक्रार केल्यावर कारवाई होत नसल्यामुळे नागरीक हतबल झाले आहेत.
PCP/DJ/1130
