Pune Crime

PUNE DISTRICT COLLECTIOR IN TOP TEN IN COUNTRY

पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम देशात टॉप टेन मध्ये

करोना महामारीत करत असलेले काम वाखाण्याजोगे


पीसीपी वृत्तसंस्था पुणे : करोनाच्या विरोधातील लढाई मध्ये करत असलेल्या धडाकेबाज कामा मध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे देशातील ७४२ जिल्हाधिका-यांमध्ये पहील्या १० मध्ये असल्याचे.फॅम इंडिया मैगझीनने आज जाहीर केले.

फॅम ईंडीया मॅगझीनने एशिया पोस्टसोबत देशात सर्वे करून देशातील ७४२ जिल्हाधिका-यांचे काम पाहिले. यातून उत्कृष्ट काम करणारे ५० जिल्हाधिकारी निवडण्यात आले. त्यानंतर या पन्नास मधुन १० जणांची निवड करण्यात आली, ज्यामध्ये नवलकिशोर यांच्या नावाचा समावेश आहे.कोरोनाच्या काळात पुणे सारख्या मोठ्या शहरातील प्रशासनावर आपली पकड कायम ठेवून पुणेकरांना सुरक्षित ठेवले आहे,त्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे .

जिल्हाधिकारी नवल किशोर हे स्वत: आपल्या कार्यालयात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे पूर्ण ऐकून घेत असतात, त्यांचा स्वभाव आणि त्यावर तात्काळ तोडगा काढणे ही कामाची पद्धत आहे.आपत्ती काळात अनेक जिल्ह्यात त्यांनी काम केले असल्याने नियोजनात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. योग्य नियोजन हे त्यांच्या यशाचे गमक आहे. बीड जिल्ह्यात असताना राम यांनी जलयुक्त शिवार असो की शासनाच्या इतर योजना जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते, लोकांशी मिळून मिसळून वागणारा अधिकारी म्हणून ते बीड,औरंगाबाद येथे परिचित होते . पुणे येथे सुद्धा त्यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे,भेटीसाठी आलेल्या सामान्य माणसाला भेटल्याशिवाय अन त्याचे समाधान केल्याशिवाय कार्यालय सोडत नाहीत.

प्रशासनात नवलकिशोर यांचे सारखे अधिकारी असले की सरकारला आपल्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवणे सहज शक्य होते, शिवाय आपत्ती काळात लोकांचे हाल कमी होतात. त्यांनी कायम सामान्य लोक डोळ्यासमोर ठेवूनच कामकाज केले आहे. भविष्यातही ते आपल्या कामाचा केंद्रबिंदू सामान्य माणूसच ठेवतील, यात तिळमात्र शंका नाही. त्यांचा कारभार एकदम पारदर्शी असतो ते नेहमी प्रसारमाध्यमांचा उपयोग करून लोकांपर्यंत प्रशासनाचे काम व नियोजन सविस्तर मांडत असतात त्यामुळे लोकांचा त्यांच्यावरील विस्वास कायम आहे.

याबाबत नवलकिशोर यांना संपर्क साधला असता, प्रतिक्रीया देण्यास ते उपलब्ध झाले नाही. पीसीपी/डीजे/१४ ४५

Share This
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top