Pune Crime

“RUDRAKSHA”” TREE ,, THAT TOO IN PUNE?

रुद्राक्षाचे झाड ते पण पुण्यात

करोनाच्या महामारीत एक शोधपत्रकारीता

पीसीपी वृत्तसंस्था पुणे प्रतीनिधी : संपुर्ण जगभरात जिथे तीथे फक्त करोना संदर्भातच बातम्या सुरु आहे. मात्र या ही परिस्थीती मध्ये करोना बरोबर शोध पत्रकारीतेच्या माध्यमातुन एक अजब माहीती समोर आली.

पुणे शहरातील एक उद्योगपती अशोक जैन यांच्या संगममरमर (मार्बल) च्या नवी खडकी येथील मुळा रस्ता कारखान्यात त्यांना त्यांचे गुरु महंत शामदासजी, गुरु रामदासजी उदासिन, जे पुणे लष्कर परिसरातील अष्टसिद्ध मंदीराचे प्रमुख होते, त्यांचे कडुन मीळालेले रुद्राक्षाच्या झाडाच्या रोपट्याचे रोपन करण्यात आले. रुद्राक्षाची झाडे ही मुख्यत: नेपाळ देशात उगवत असतात याला कारण तेथील हवामान. तसे हवामान हे आपल्या शहरात अशक्य असल्यामुळे या रोपाची पुरेपुर निगा उद्योपतीचा माळी चोखपणे घेत होता, तसेच हे रोप गुरुंनी लावले असल्यामुळे त्याकडे पुर्ण लक्ष ठेवण्यात येते, तसेच या सर्वांनी घेतलेली मेहनत या झाडाला फळली व येथील हवामान सुद्धा मानवले.

जवळपास २ दशकांनंतर या झाडाला रुद्राक्षाचे फळ येण्यास सुरुवात झाली हे पाहुन या उद्योपतीला व त्यांच्या परिवाराला आनंदाचा धक्काच बसला. या बाबत पीसीपी वृत्तसंस्था प्रतीनिधी बरोबर बोलताना अशोक जैन म्हणाले की, आम्हाला झाड जगणार का, या बाबत मोठी शंका होती, मात्र गुरुंचा आदेश व त्यात अध्यात्म आलेच व रुद्राक्षाला हींदु धर्मात खुप महत्वाचे स्थान आहे, त्यामुळे हे झाड येथे जगवायचेच या उद्देशाने आम्ही काळजी घेत आलोय. आता पर्यंत या झाडाला अनेक वेळा बहर आला व त्यातुन शेकडो रुद्राक्षाची फळे आली आहेत व त्यापैकी अनेक रुद्राक्ष मीत्रांना दिली आहेत, आमच्या मंदीरात याची रोज पुजा होते. आम्हाला समाधान एवढेच आहे की, गुरुंनी लावलेले रुद्राक्षाचे रोपटे आम्ही येथील हवामानात जगवले, हाच मोठा चमत्कार आहे, आज हे झाड ३० फुटांपेक्षा जास्त वाढले आहे. अशा प्रकारचे एक ही झाड आपल्या शहरात असल्याचा अभीमान असल्याचे अशोक जैन यांनी सांगीतले.

पुणे महानगर पालीकेचे मुख्य उध्यान अधिक्षक अशोक घोरपडे यांना या रुद्राक्षाच्या झाडाबाबत विचारले असता, त्यांना हे एैकुन धक्काच बसला, कारण संभाजी उध्यानात “भद्राक्षाचे” झाड आहे मात्र रुद्राक्षाच्या झाडाला आपल्या येथील हवामान मानवत नाही, हे झाडे जगले हेच मोठे आश्चर्य असल्याचे त्यांनी म्हटले. या झाडाचे फळ रुद्राक्षला हींदु धर्मात खुप मान आहे मात्र यात अनेक मुख निघत असल्याचे म्हटले जाते पण ही सर्व क्रीया नैसर्गीक आहे, यातील एक मुखी, पंचमुखी रुद्राक्षाला मोठी मागणी असते पण यात अनैसर्गिकरित्या तयार करुन बनावट रुद्राक्ष विकण्याचा धंदा अनेकजण करतात. या झाडाचा अभ्यास करणे महत्वाचा असेल, असे घोरपडे म्हणाले. मात्र हा खरेखोर चमत्कार आहे, हे सांगण्यास ते विसरले नाहीत.

भारतात रुद्राक्ष मणी धारण करण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे, खास शैव लोकांमध्ये. याचे कारण भगवान शंकरांशी असलेला त्याचा संबंध आहे. भगवान शंकर स्वतः रुद्राक्ष माला धारण करीत असत. रुद्राक्षाच्या मणींचा वापर करीत ओम नमः शिवायचा जाप केला जातो. जरी त्यात खास असे कोणतेही प्रतिबंध नसले,तरी देखील महिलांमध्ये मोतींसारख्या इतर पदार्थांपासून बनविलेले मणी धारण करणे सामान्य आहे.

रुद्राक्षाचे मणी एकमेकात ओवून माला बनविली जाते आणि ख्रिश्चन लोकांमध्ये ज्या रीतीने जपमाळा वापरतात, त्याच रीतीने एखादे मंत्र किंवा प्रार्थना करताना मोजण्यासाठी वापरले जाते. बहुतेक माळांमध्ये १०८ मणी अधिक एक असतो, जिथे १०८ ला पवित्र आणि एखाद्या लहान मंत्राचा पाठ करण्यासाठी योग्य मानले जाते. अतिरिक्त मणीला “मेरू”, “बिंदू” किंवा “गुरु मणी” असे म्हटले जाते, जे १०८ च्या चक्राच्या आरंभाचे आणि अंताचे चिन्ह असते आणि तसेच, एक “मुख्य” मणी म्हणून त्याचे प्रतीकात्मक मूल्य असते. असे मानले जाते की रुद्राक्ष मण्या हा पवित्र पदार्थ उच्चारीत मंत्रातील उर्जा पकडून ठेवतो आणि प्राथना करणाऱ्याच्या एकाग्रतेत आणि अध्यात्मिक विकासात मदत करतो.

रुद्राक्ष हा मिश्र असा संस्कृत शब्द आहे, ज्यात रुद्र (शंकर) आणि अक्ष (“डोळ्यातील अश्रुचे थेंब”) हे सामील आहेत. पीसीपी/देजै/१७३०

Share This
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top