Pune Crime

STREET CAMERA SPOTTED “THIS” PERSON, PROSECUTION MAY FAIL TO PROVE — WHY ???

अवतारसींग दुग्गल

पोलीसांच्या स्वयंचलीत कॅमे-याने “”त्याला”” अचुक टीपले

केंद्रीय मोटर वाहन कायद्याच्या तरतुदीमुळे खटला होणार अयशस्वी

पीसीपी वृत्तसंस्था पुणे प्रतीनिधी : शहरात बसवलेल्या कॅमे-यांमुळे बेशिस्त वाहनचालकांवर थेट खटले भरले जात आहे मात्र या केंद्रीय मोटर वाहन कायद्यातील तरतुदीमुळे ज्यांना वहातुक नियमातुन वगळले आहे त्यांना वहातुक नियमभंग केल्याप्रकरणी दाखल होणा-या अश्या खटल्यांमुळे मानसिक त्रास होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

अवतारसींग दुग्गल हे शिख आहेत व ज्येष्ठ नागरीक सुद्धा आहेत, ते नाना पेठ येथे राहतात. लाॅकडाउन सुरु असताना घरगुती सामान खरेदी करण्यासाठी ते काहीवेळा त्यांच्या दुचाकीवर बाहेर जात असत. काही दिवसांनी त्यांच्या मोबाईलवर पुणे पोलीसांचा संदेश आला,. (Maharashtra Traffic Police Echallan No. PNCCC20001192156 Fine:500 Pay online: https://mahatrafficechallan.gov.in/p/92a731640 (within 15 days) ज्यामध्ये त्यांना दोन वेळा हेलमेट परिधान न केल्यामुळे प्रत्येकी पाचशे रुपये व त्यांची दुचाकी त्यांनी योग्य ठीकाणी लावलेली असताना, “”नो पार्कींग” २०० रुपये, असा १२०० रुपये दंड झाल्याचे संदेशात म्हटले आहे व त्याकरीता स्वयंचलीत कॅमे-यांतुन प्राप्त झालेली छायाचित्र सुद्धा जोडण्यात आली आहे. मात्र केंद्रीय मोटर वाहन कायद्यातील तरतुदीमुळे शिख समाजातील पगडी असलेल्यांना हेलमेटच्या सक्तीतुन वगळले आहे. सक्तीतुन वगळलेल्यां बाबत स्वयंचलीत कॅमे-यां मध्ये नोंद अथवा तरतुद नसल्यामुळे त्यांनी वहातुक शाखेच्या येरवडा येथे जाउन तेथील पोलीसांना माहीती दिली. तेथील पोलीसांनी नेहमीप्रमाणे दुग्गल यांना उडवाउडवीची उत्तरे दिली व लाॅकडाउन सुरु असल्यामुळे कामकाज बंद असल्याचे सांगीतले व नंतर येण्यास सांगीतले. पुणे पोलीसांचे शहर वहातुक विभागाचे मद्यवस्तीतील कार्यालय कारण नसताना शहराबाहेर गेल्यामुळे या त्रासात मोठी भर पडत असल्याचे दिसुन आले आहे. सर्वसामन्य नागरीकांना पुर्वीचे कार्यालय हे अतिशय सोयीचे असताना ते शहराबाहेर का नेण्यात आले? याचे उत्तर कोणाकडे नाही.

दुग्गल हे शिख असल्यामुळे त्यांना झालेला दंड सहन होत नव्हता म्हणुन ते काही दिवसांनी परत वहातुक विभागाच्या कार्यालयात गेले व त्यांच्या समाजाला हेलमेट सक्तीतुन वगळण्यात आले आहे तसेच त्यांनी त्यांची दुचाकी योग्य ठीकाणी लावलेली असताना २०० रुपये दंड त्यांनी का भरावा? असा प्रश्न तेथील अधिका-यांना केला कारण दंडा बरोबर जोडण्यात आलेल्या छायाचित्रात त्यांची दुचाकी “”नो पार्कींग” मध्ये असल्याचा तेथे कींवा जवळपास फलक नसल्याचे त्यांनी सांगीतले. मात्र दंड भरावा लागेल असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी पीसीपी वृत्तसंस्थेला ही माहीती व छायाचित्र दिली.

या बाबत मोटार परिवहन विभागाचे परिवन अधिकारी अजित शिंदे यांना विचारले असता, त्यांनी पगडी वापरत असलेल्या शिख नागरिकांना हेलमेट सक्तीतुन वगळले असल्याचे सांगीतले तसेच नो पार्कींग करीता २०० रुपये दंड बाबत, त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. या बाबत वहातुक उपायुक्त प्रसाद अक्कानुरु यांना संपर्क केला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

शहरात काही शेकडो कोटी रुपये खर्च करुन बसवण्यात आलेल्या या सर्व कॅमे-यां मध्ये कालानुरुप बदल व ज्यांना सक्तीतुन वगळण्यात आले त्यांच्यावर खटला दाखल करणे योग्य नसल्याचे मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगीतले. PCP/DJ/13 45

Share This
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top