Pune Crime

USE OF “EXTRA” ADVANCE TECHNOLOGY FOR PUNE POLICE RESULTS FRUITFULविकसित आधुनीक प्रणालीच्या वापराचा पोलीसांना झाला “EXTRA” फायदा

केले तडीपार गुंडाला जेरबंद


पीसीपी वृत्तसंस्था प्रतिनिधी: पोलीस आयुक्त डाॅ के वेंकटेशम यांनी शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधीत राखण्याकरीता आधुनीक तंत्रध्यानाचा वापर करण्यावर मोठा भर दिला. त्याचा निश्चितच फायदा होत असल्याचे आज केलेल्या “EXTRA” नावाच्या नवीन विकसित केलेल्या प्रणालीच्या वापरातुन करण्यात आलेल्या कामगीरीतुन सिद्ध झाले. तडीपार गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी “ExTra” (Tracking of Externees) प्रणाली २३/०५/२०२० रोजी विकसित केली होती. या प्रणालीचे कामकाज, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, गुन्हे शाखेचे पोलीस उरायुक्त बच्चन सिंग यांचे प्रत्यक्ष देखरेखीखाली प्रतिबंधक विभाग,गुन्हे शाखा येथे चालत आहे

पुणे शहरातुन तडीपार केलेल्या एका गुंडाला या नवीन विकसीत केलेल्या “EXTRA” प्रणालीचा आज वापर करुन जेरबंद करण्यात आले. शहरात दहशत पसरविणाऱ्या सराईत गुन्हेगारांना तडीपार केल्यानंतरही ते अनेकदा शहरात येऊन गुन्हे करीत असतात. त्यांच्यावर लक्ष ठेवणे दिवसेंदिवस कठीण होत जाऊ लागले होते. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या घरी अथवा राहण्याच्या ठिकाणी जाऊन त्यांना तपासणे धोक्याचे ठरू शकते. त्यासाठी पुणे पोलिसांनी होम क्वारंटाईन केलेल्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी वापरलेल्या ट्रॅकिंग सिस्टिम प्रमाणे तडीपार गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी ही प्रणाली विकसित केली होती.

या प्रणालीच्या वापरातुन, तडीपार (हद्दपार) गुन्हेगारास गुन्हेगारी कृत्य करण्यापासुन परावृत्त करण्यासाठी, हद्दपार आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे, गुन्हेगारावर निगराणी अथवा देखरेख सोयीस्कर पणे करणे, कमी मनुष्यबळामध्ये परिणामकारकरित्या गुन्हेगारावर निगराणी ठेवणे, हद्दपार आदेशाचे उल्लघंन होवुन दाखल होणाऱ्या गुन्हयांचे प्रमाण कमी करणे तसेच त्यामुळे पोलीस तपास यंत्रणेवरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी व ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हेगार हद्दपार कालावधीमध्ये वास्तव्यास असेल तेथे देखील नमुद गुन्हेगारावर प्रभावी निगराणी ठेवता येणे. या उद्देशाने ही प्रणाली विकसित केली गेली होती.

ही प्रणाली विकसित करण्यात येवुन त्याची अंमलबजावणीची सुरूवात करण्यात आली आहे असता आज बिबवेवाडी पोलीस स्टेशनकडील हद्दपार आरोपी शंकर ऊर्फ बाबु कैलास पंधेकर वय- २२वर्ष, रा,ओटा अपर बिबवेवाडी, पुणे यास पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०५ यांचेकडील तडीपार आदेश क्रमांक ०८/२०२०, दिनांक १७/०६/२०२० रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ५६ (१)(अ)(ब) अन्वये पुणे पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हयातुन एक वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले होते. त्यास हद्दपार करताना “ExTra” (Tracking of Externees) ॲप त्याच्या मोबाईल नंबर मध्ये डाऊनलोड करण्यात आले होते. सदर ॲपद्वारे त्यास त्याचे वास्तव्य ज्या भागात आहे त्याबाबतची खातरजमा करण्याकरीता ExTra ॲपमध्ये दिवसातुन एकदा त्याचा सेल्फी फोटो अपलोड करावा असे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे सदर हद्दपार इसमास दिनांक १६/०६/२०२० रोजी बार्शी पोलीस स्टेशन येथे त्याचे नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले होते. त्याप्रमाणे दिनांक १७/०६/२०२० पासुन हद्दपार इसम त्याचे दैनंदिन हजेरी “EXTra” (Tracking of Externees) ॲपवर देत होता.

त्यानंतर आरोपी दिनांक २६/०६/२०२० रोजीपर्यंत नमुद अपमध्ये दैनंदिन हजेरी नोंदवित होता. दि २७/०६/२०२० रोजी हद्दपार इसम पुणे शहर बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात असल्याचा अलर्ट मेसेज प्राप्त झाल्याने त्याचा अक्षांश व रेखांश गुगल मॅपवर टाकुन तपासला असता तो बिवेवाडी पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात असल्याचे निदर्शनास आले. त्याप्रमाणे त्याची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेतली असता तसेच त्याचे राहते घरी शोध घेतला असता तो मिळुन आला नाही. परंतु त्याने दिनांक २७/०६/२०२० ते दिनांक २९/०६/२०२० या कालावधीमध्ये हजेरी सदर ॲपमध्ये नोंदविली नाही. त्यामुळे नमुद त्याचे विरूध्द दिनांक २९/०६/२०२० रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम १४१,१४२ अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे.

सदर प्रणालीवर प्राप्त झालेल्या अलर्टची माहिती परिमंडळ ५ चे उपायुक्त सुहास बावचे, यांना देण्यात आली. त्यांचे मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पो.स्टे.पुणे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस उप-निरीक्षक दत्ता काळे, पो.शि. स्मित चव्हाण व पो.ना. चेतन कुंभार यांनी कारवाई केली.

ही प्रणाली तयार करण्यासाठी सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चनसिंग,यांनी विशेष प्रयत्न केले होते. पीसीपी/डीजे/१७३०.

Share This
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top