Pune Crime

BRANDED COMPANY BASMATI RICE FILLED WITH LARVAE AND INSECTS – FDA TAKES ACTION AGAINST REPUTED SHOP OF CITY

फाॅर्चुन कंपनीच्या तांदुळात आळ्या किडे

अन्न औषध प्रशासन विभागाने, शहरातील नामांकीत दुकानातुन घेतले नमुने

कोणत्याही दबावाला बळी न पडता करणार कारवाई – सुरेश देशमुख सह आयुक्त

(पीसीपी वृत्तसंस्था) पुणे क्राईम पॅट्रोल प्रतीनिधी : शहरातील नामांकीत असलेल्या “ग्राहक पेठ” या दुकानातुन ग्राहकाने खरेदी केलेल्या “फाॅर्चुन एवरीडे बासमती राईस (ए) ४”” मध्ये मोठ्या प्रमाणावर आळ्या व किडे आढळल्यानंतरल संबंधीत ग्राहकाने अन्न औषध प्रशासन विभागाकडे केलेल्या तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर, नागरीकांच्या आरोग्याशी खेळणा-या कोणत्याही आस्थापनेची गय करणार नसल्याचे, या विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी सांगीतले.

संजय पायगुडे व सुबोध घाडगे, राहणार कसबा पेठ यांनी लाॅकडाउन सुरु असताना, १५ जुन २०२० रोजी टीळक रस्त्यावरील “ग्राहक पेठ” या दुकानातुन “फाॅर्चुन एवरीडे बासमती राईस ची १० कीलोची पीशवी खरेदी केली. घरी गेल्यावर पीशवी उघडली असता त्यामध्ये असलेल्या तांदुळात मोठ्या प्रमाणावर आळ्या व किडे बाहेर पडु लागले. पायगुडे यांनी पीशवी बंद करुन परत ग्राहक पेठ गाठली व तेथील व्यवस्थापकांना सदर बाब दाखवली. मात्र त्यांनी पायगुडेंना दाद लागु दिली नाही, त्यामुळे त्यांनी या आस्थापनेचे मुख्य सुर्यकांत पाठक यांना भेटुन सर्व घडलेला प्रकार सांगीतला व संबंधीत कंपनीच्या अधिका-यांना कळवण्याची विनंती केली. मात्र फाटक यांनी सुद्धा उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यामुळे पायगुडे यांनी अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे फाटक यांना सांगीतले, ही मात्रा लागु पडली व घाडगे यांच्या तक्रारीचे निराकरण होत नाही तो पर्यंत “फाॅर्चुन ” कंपनीचा बासमती तांदुळ विकणार नाही, असे लेखी दिले. तसेच संबंधीत कंपनीचे अधिकारी धिरज यांना भेटण्यास सांगीतले.

दुस-या दिवशी पायगुडे यांनी फाॅर्चुन च्या धिरज यांना संपर्क केला असता, काय करायचे ते करा, कुठे तक्रार करायची तेथे करा, आम्हाला काही फरक पडणार नाही, तांदुळ बदलुन मीळणार नाही, असे पायगुडे यांना सांगीतले. १८ जुन रोजी पायगुडे व घाडगे परत “ग्राहक पेठेत” गेले, त्यांना फाॅर्चुन तांदुळ विकणार नाही असे लेखी देउन सुद्धा दुकानात हाच तांदुळ परत विक्री करत असल्याचे दिसुन आले. म्हणुन त्यांनी तडक अन्न औषध प्रशासनाचे कार्यालय गाठले व लेखी तक्रार दाखल केली.

अन्न सुरक्षा अधिकारी सो. ह. ईंगळे यांनी तक्रारीची दखल घेउन “ग्राहक पेठ” येथे २० जुन रोजी जाउन “फाॅर्चुन” कंपनीच्या तांदळाचे नमुने जप्त केले व “ग्राहक पेठ” या संस्थेविरोधात अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ नुसार कारवाई करत असल्याचे, पायगुडे यांना लेखी कळवले.

या बाबत संबंधीत कंपनीचे धिरज यांना संपर्क केला असता, पॅक माल फोडल्यानंतर आम्ही काहीही करु शकत नाही, असे सांगीतले. मालाची पीशवी फोडल्याशिवाय आंतील माल चांगला आहे का खराब हे ग्राहकाला कसे कळणार, असे विचारले असता, त्याकरीता संबंधीतांनी कंपनीला कळवावे, असे सांगीतले. सुर्यकांत फाटक यांना अनेकवेळा संपर्क केला असता ते प्रतिक्रीया देण्यास उपलब्ध झाले नाही. PCP/DJ/1430

Share This
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top